शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

मलकापूरच्या मुलींनाच मिळेना बस !

By admin | Updated: September 1, 2015 20:17 IST

युवती हतबल : ‘स्पेशल बस’च्या वेळापत्रकाचा खेळखंडोबा; उपाययोजनेची मागणी

मलकापूर : मलकापूरच्या मुलींसाठी स्वतंत्र बस सुरू करण्यात आली. या योजनेचा राज्यभर आदर्श घेवून अनेक ठिकाणी महिलांच्या स्वतंत्र बस सुरू झाल्या. सध्या मात्र बस फेऱ्यांच्या वेळापत्रकाचा खेळखंडोबा झाल्यान विद्यानगरहून परतताना मलकापूरच्या मुलींनाच बस मिळेना झाली आहे. दरम्यान बसवेळेत न मिळाल्याने शेकडो मुलींना तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे किंवा रिक्षासाठी पैसे मोजावे लागत आहे. या कोल्मडलेल्या वेळापत्रकाचा हजारो मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. मलकापूर नगरपंचायतीने मुलींना मोफत पास व स्वतंत्र बससेवा सुरू केली. ही बससेवा दोन वर्षांपासून अखंडीतपणे सुरू आहे. १ हजारपेक्षा जास्त मुलींना मोफत बसपासचे वाटपही करण्यात आले आहे. या आदर्श योजनेचा राज्यभर गवगवाही झाला मुलींच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने पे्रमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियान नगरपंचायतीने सातत्याने यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी नगरपंचायत लाखो रूपये खर्चही करते. प्रत्यक्षात मात्र कन्यासुरक्षा अभियानात अनेक अडचणी आहेत. त्या शोधणे गरजेचे आहे. मलकापूर ते विद्यानगर मधील शास्त्र महाविद्यालय, महिला उद्योग ते शास्त्र महाविद्यालय या दोन मार्गाने या योजनेच्या बस धावतात. मलकापूरातील विविध विभागातून सुमारे १ हजारापेक्षा जास्त मुली कऱ्हाड व विद्यानगर येथे शिक्षणासाठी जातात. विविध महाविद्यालयांच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळापत्रकानुसार बसफेऱ्या असणे गरजेचे आहे. विद्यार्थीसंख्या विचारात घेता व मुलींचे प्रमाण विचारात घेता, सध्या बसफेऱ्या अपूऱ्या पडताना दिसत आहेत. अनेक विद्यार्थीनींना बसस्टँडपर्यंत पायपीट करावी लागत आहे. तासन-तास थांबून शेवटी पास असूनही रिक्षाला पैसे देवून प्रवास करावा लागत आहे. मलकापूर व महिलाउद्योग या बसेस शास्त्र महाविद्यालय, वेणूताई चव्हाण कॉलेज व अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातच फुल्ल होत आहेत. त्यामुळे गाडगे महाराज महाविद्यालयात शिकणाऱ्या हजारो मुलींना बसच मिळत नाही. चुकून एखाद्यावेळी रिकामी बस आल्यास सर्वच मुली एकाच बसला रांगा लावतात. शेवटी बस फुल्ल झाली की, रांगेतील मलकापूरच्या मुलींना बसच मिळत नाही नंतरच्या फेरीला बस मिळेल या आशेने तासन्तास रांगेत उभे राहूनही अनेकवेळा बस परत येतच नाही. याचा त्रास मुलींना सहन करावा लागत आहे.बस वेळेत न आल्याने व अनेकवेळा बस मिळत नसल्यामुळे महाविद्यालय सुटण्याच्या तसेच भरण्याच्या वेळेत महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारात रिक्षा व्यवसायीकांची चांगलीच गर्दी होत आहे. बसची वाट बघण्यापेक्षा अनेक विद्यार्थी रिक्षानेच प्रवास करतात. त्यामुळे रिक्षा व्यवसायीकांची चांगलीच चलती आहे. (प्रतिनिधी)महिला उद्योग ते कॉलेज बस वेळेत येत नाही. सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास आगाशिवनगर मधून जाणाऱ्या सुमारे ३० ते ४० मुली आहेत. साडे सहाच्या बसला गेलो असता ही बस लवकर तरी गेलेली असते किंवा साडेसात वाजले तरी येत नाही. त्यामुळे रिक्षाने जाण्याशिवाय पर्याय नाही. अनेकवेळा कॉलेजवरून ही बस स्टँडपर्यंतच यते व इतर गावाला जाते. आगाशिवनगरला जाणाऱ्या ३० ते ४० मुलींना स्टँडवरच उतरवले जाते. - पूजा पवार, विद्यार्थीनी आम्ही कसा भेदभाव करू ? मुलींची बस म्हंटलं की महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थीनी मुलींच्या बसकडे धावतात. शिस्तीसाठी रांगही लावतो मात्र मलकापूरच्या मुली व इतर मुलींमध्ये आम्ही चालक किंवा वाहक कसा भेदभाव करू शकतो. सर्व मुली एकच आम्ही कुणाला मागे सर म्हणणार ? असे त्याठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या एस. टी वाहकाने सांगितले. कॉलेजवरून सुटताना शिस्तीसाठी मुलींना व मुलांना बसला रांगेतूनच प्रवेश दिला जातो. एस. टी. स्टँड वरही रांगेतच बसमध्ये प्रवेश मिळतो. विद्यार्थी व विद्यार्थीनींची संख्या जास्त असल्यामुळे अनेकवेळा लांबच्यालांब रांगा लागतात. काही वेळा विद्यार्थ्यांचे तासही बुडतात.