शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

मलकापूरचे नगरसेवक पवार अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:46 AM

मलकापूर : टेम्पो आणि कारची धडक होऊन मलकापूरचे नगरसेवक दत्ता सीताराम पवार (वय ४३) यांचा मृत्यू झाला, तर अन्य ...

मलकापूर : टेम्पो आणि कारची धडक होऊन मलकापूरचे नगरसेवक दत्ता सीताराम पवार (वय ४३) यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरनजीक खंडोबानगर येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.समाधान चव्हाण व केदार होगले अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे असून, त्यांच्यावर कºहाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूरचे नगरसेवक दत्ता पवार यांच्यासह त्यांचे मित्र समाधान चव्हाण व केदार होगले हे शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कारमधून (एमएच ११ एके ५६९०) पाचवड फाट्याकडून कºहाड बाजूकडे येत होते. मलकापूर हद्दीत खंडोबानगरजवळ महामार्गावर टेम्पो (एमएच १२ एचडी ५६२६) हा टायर पंक्चर झाल्याने उभा होता. दरम्यान, पाठीमागून आलेल्या कारची टेम्पोला धडक बसल्याने कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले.अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कृष्णा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून दत्ता पवार यांना कोल्हापूरला हलवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कºहाड शहर पोलिसांत झाली आहे.