शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांवरील अडीचशे मालमत्ता पाडणार

By admin | Updated: December 23, 2015 00:10 IST

औरंगाबाद : शहरातील नाल्यांमध्ये अतिक्रमण करून बांधलेल्या अडीचशेहून अधिक मालमत्ता भूमिगत गटार योजनेमुळे धोक्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : शहरातील नाल्यांमध्ये अतिक्रमण करून बांधलेल्या अडीचशेहून अधिक मालमत्ता भूमिगत गटार योजनेमुळे धोक्यात आल्या आहेत. भूमिगत गटारची लाईन टाकण्यास या मालमत्ता अडथळा ठरत आहेत. त्यामुळे संबंधित मालमत्ता पाडण्याचे आदेश मंगळवारी प्रभारी मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. शहरातील नाल्यांच्या काठांवर तसेच नाल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. अनेक ठिकाणी लोकांनी नाल्यांवर स्लॅब टाकूनही बांधकाम केले आहे. आतापर्यंत पालिकेकडून या मालमत्तांकडे दुर्लक्ष झाले; परंतु आता यातील काही मालमत्ता भूमिगत गटार योजनेच्या कामात अडथळा ठरत आहेत. शहरात मागील सव्वा वर्षापासून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. ४६७ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेंतर्गत शहरात प्रमुख आणि अंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. संबंधित ठेकेदाराकडून विविध भागांत हे काम सुरू आहे; परंतु काही ठिकाणी नाल्यांमधून प्रमुख मलनिस्सारण वाहिन्या नेण्यास अतिक्रमणांचा अडथळा येत आहे. अतिक्रमित मालमत्ता पाडल्याशिवाय तेथे प्रमुख मलनिस्सारण वाहिनी टाकणे शक्यच नाही, अशा मालमत्तांची काही दिवसांपासून पालिका प्रशासनाने यादी केलेली आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या सर्वेक्षणाचा अहवाल तयार करून तो पुढील कारवाईसाठी नगररचना विभागाकडे सादर केलेला आहे. त्यावर आता नगररचना विभागाने मार्किंग करून नेमका अतिक्रमित भाग दर्शवायचा आहे. त्यानंतर ही संचिका पुढील कारवाईसाठी प्रशासकीय विभागाकडे जाईल. प्रभारी मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज बोलाविलेल्या स्थायी समिती सदस्यांच्या बैठकीतही हा मुद्दा चर्चेला आला. त्यावर केंद्रेकर यांनी अडथळा ठरणारी ही अतिक्रमणे तात्काळ पाडा, असा आदेश प्रशासनाला दिला. त्यामुळे आता लवकरच अशी कारवाई होणार आहे.मालमत्ता पाडणे हाच पर्यायशहरात सव्वा वर्षापासून भूमिगत गटारचे काम सुरू आहे. आतापर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त काम झाले आहे. ठेकेदाराला हे काम पूर्ण करण्यासाठी आता आणखी दीड वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. या काळात काम पूर्ण होण्यासाठी अडथळे दूर होणे गरजेचे आहे. ते दूर झाल्यावरच काम पूर्ण होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.