शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वेळे ढेण कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन तातडीने करा

By admin | Updated: June 20, 2017 17:24 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २0 : कोयना प्रकल्पग्रस्त वेळे ढेण, ता. जावळी या गावातील प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पग्रस्तांचे रायगड जिल्ह्यात पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, हाही निर्णय आता रद्द झाला असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वेळे ढेण येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातच करा. तसेच त्यांना शेतीयोग्य जमीन द्या. याबाबत येत्या महिनाभरात निर्णय घ्या, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

वेळे ढेण येथील कोयना प्रकल्पग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबीत प्रश्नासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला मुख्यवनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, उप संचालक डॉ. विनिता व्यास, प्रकल्प अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक (कोयना) तानाजी गायकवाड यांच्यासह कोयना प्रकल्पग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पवार, रामचंद्र कोकरे पाटील, जगन्नाथ कोकरे, पांडूरंग कोकरे, लक्ष्मण कोकरे, गोविदं कोकरे, विलास कोकरे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

या बैठकीत रामचंद्र कोकरे आणि प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या मांडून या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातच करण्यात येईल. त्यांना शेतीयोग्य जमीन देण्यात येईल, असे बेन यांनी यावेळी सांगितले. मात्र जमीन खडकाळ आणि मुरमाड असल्याने ती शेती योग्य नाही. आम्हाला शेतीयोग्य जमीन द्या, अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. यावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शेतीयोग्य जमिनीतीच करावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. तशी जमीन उपलब्ध नसल्यानस वनविभागाच्या उपलब्ध जमिनी देता येतील का, याचाही विचार करावा. तसेच येत्या महिनाभरात पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. प्रशासकीय अडथळे येत असतील तर, वेळे ढेण येथील २६ प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवा. आपण योग्य तो पाठपुरावा करु, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

येत्या महिनाभरात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तसेच प्रकल्पग्रस्तांना सातारा जिल्ह्यात शेतीयोग्य जमिनी मिळतील यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन डॉ. बेन यांनी यावेळी दिले. बैठकीत झालेल्या सकारात्मक चचेर्मुळे पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न येत्या महिनाभरात सुटेल अशी आशा वेळे ढेण येथील प्रकल्पग्रस्तांनी यावेळी व्यक्त केली आणि आ. शिवेंद्रसिंहराजे व उपस्थित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.