बसथांबे उद्ध्वस्त
मल्हारपेठ : कऱ्हाड-नवा रस्ता दरम्यान मार्गावर एकही झाड शिल्लक राहिलेले नाही. उभे असणारे बसथांबेही भुईसपाट झाले आहेत. कऱ्हाड-पाटण या ३४ किलोमीटर अंतरातील अनेक थांबे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या मार्गावर बसथांबे उभारण्याची मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
वडगाव हवेली : शेरे ते दुशेरे रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. याचा त्रास येथून प्रवास करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना होत आहे. सतत होणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीने या ठिकाणांदरम्यानचा रस्ता खराब झाला आहे. दुचाकीस्वारांना रस्त्यात असलेल्या खड्ड्यांचा रात्रीच्या वेळी अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पादचारी मार्गाची दुरवस्था (फोटो : ०८इन्फोबॉक्स०२)
कऱ्हाड : शहरातील दत्त चौक ते कृष्णा नाका या मार्गादरम्यान रस्त्याकडेला असणाऱ्या पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या पादचारी मार्गावर ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या फरशा फुटल्या आहेत. त्यामुळे खड्डे निर्माण झाले असून पादचाऱ्यांना यावरून प्रवास करताना धोका निर्माण होत आहे. पादचारी मार्गाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.