शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

१३ तास... १६ पोती अन् २ हजार चाैरस फुट जागेवर छत्रपती संभाजी महाराजांची महारांगोळी

By प्रगती पाटील | Updated: April 8, 2024 19:12 IST

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज यांना आदरांजली म्हणून राजवाडा चौपाटी गांधी मैदान येथे ही रांगोळी काढण्यात आली.

सातारा : फाल्गुन अमावस्या अर्थात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यातील रांगोळी कलाकार आकाश दळवी याने चक्क १३ तासात १६ पोती रांगोळींचा वापर करून तब्बल ६० बाय ३६ फुट अर्थात २ हजार चाैरस फुट क्षेत्रात छत्रपती संभाजी महाराज यांची रांगोळी रेखाटली. राजवाडा चाैपाटी येथील ही रांगोळी सातारकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज यांना आदरांजली म्हणून राजवाडा चौपाटी गांधी मैदान येथे ही रांगोळी काढण्यात आली. औरंगजेबाने फितुरीने संभाजी महाराज याना अटक केली व ४० दिवस त्यांचे अतोनात हाल करून फाल्गुन अमावस्या दिवशी त्यांना मारले जगाच्या इतिहासत एकाद्या राजाला एवढ्या क्रूरपणे मरण्याची ही एकमेव घटना. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने व संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली खेडोपाडी युवक पाळत आहेत.

याचाच भाग म्हणून साताऱ्यातील आकाश दळवी या रांगोळी कलाकाराने रविवारी रात्री ९ वाजता रांगोळी रेखाटायला सुरूवात केली. यासाठी त्याला बबन लोहार आणि साइ थोरात या दोन कलाकारांचीही मदत झाली. रात्री ९ वाजता सुरू झालेले हे रेखाटन तब्बल १३ तास चालले सकाळी ११ वाजता ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. गौंधी मैदानाच्या सोमण व्यासपीठासमोर काढलेली ही महाकाय रांगोळी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.

१. चाळीस दिवसांचा सुतकाचा महिनाधर्मवीर संभाजी महाराज यांचा छळ झाला ते ४० दिवस सुतकाचा महिना म्हणून महाराजांच्या विचारांचा आणि त्यागाच्या महिन्यात युवक गोड खात नाही, पायात चप्पल घालत नाहीत, गादीऐवजी जमिनीवर झोपतात. अशा कृतीतून श्रध्दांजली व बलिदान मास पाळला जातो. धर्मवीर बलिदान मास उभ्या हिंदुस्थानला अंतर्मुख करणारा क्लेशकायक, दुःखदायक मास आहे. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या महिना भरात रोज एकत्र जमून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास याचे श्लोक पठण होत असते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासच्या निमित्ताने त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. यंदा राजवाडा गांधी मैदानावर त्यांची भली मोठी रांगोळी साताऱ्यातील कलाकारांनी साकारली. यानिमित्ताने राजांचे कार्य आणि त्यांचा त्याग याची माहिती पुढील पिढीस होण्यास मदत होइल.- धनंजय खोले

टॅग्स :rangoliरांगोळी