शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘रामप्रसाद’ हत्तीच्या विरहानं माहुतपुत्र तापानं फणफणला

By admin | Updated: December 23, 2015 01:14 IST

‘पाल’नगरीही हळहळली : माहूत जावेद शेख कुटुंबीय दिवसभर रिकाम्या शेडसमोर बसून

जगदीश कोष्टी - सातारा -सातारा : अंगाखांद्यावर खेळलो... त्याचे कान, सोंड, शेपूट ओढले तरी त्यानं न चिडता ते गंमतीवर घेतलं... महाकाय प्राणी पण आपल्या त्रासामुळं कधीच चिडला नाही, असा रामप्रसाद रविवारी मथुरेला गेला. त्याच्या विरहाने माहूत जावेद शेखचा पाच वर्षीय मुलगा नवमान तापानं फणफणला आहे.पालच्या खंडोबा देवस्थानच्या हत्तीचे माहुताशी तीन पिढ्यांचे नाते जुळले आहे. जावेद यांना मुलगा नवमान हा पाच वर्षांचा असून, त्याला कळायला लागल्यापासून रामप्रसादचा सवंगडीच बनला आहे. रामप्रसादनेही कधीही मुलांना त्रास दिलेला नाही. त्यांचा एक वर्षाचा मुलगा हत्तींच्या पायाखालीच अनेकदा खेळायचा. त्याला पाहून भाविकही अवाक होऊन जायचे. पण त्याचे हत्ती आणि संबंधित बाळाला कधीच नवल वाटलं नाही. बाळाच्या नखालाही कधी धक्का लागलेला नाही, हे जावेद शेख अभिमानानं सांगतात. मुलंही आठवण काढत आहेत. नवमान ‘रामप्रसाद कोठे गेलाय,’ म्हणून विचारत आहेत. त्याला ‘तो परत येईल,’ असे सांगून समजूत काढत आहेत. अशी होती जावेदची दिनचर्यापहाटे उठून शेडमधील झाडलोट करणेरामप्रसादला आंघोळ घालणेसकाळी अकरा वाजता त्याला फिरवून आणणे.त्याला जखम झालेली असल्यास दुपारच्या वेळेत ती स्वच्छ करणे.सायंकाळी चार वाजता परत फिरवून आणणे.पंधरा दिवसांतून एकदा त्याची नखे काढणे.दर रविवार, पौर्णिमेला दिवसभर मंदिर आवारात उभे करणे.रामप्रसादचा कान फाटल्याचे निमित्त करून त्याला नेले. तेथे नेऊनही जंगलात सोडणार नाहीत. तेथे बांधूनच ठेवणार असतील तर येथे काय अडचण होती. गेल्या वर्षी यात्रेत गर्दीत गोंधळला त्यावेळीही आम्ही केवळ शब्दाने त्याला ‘रामू... शांत होत जा बेटा’ म्हणून शांत केले होते. - जावेद शेख, माहूतहत्यारे नेली पण आठवणी नाही दिल्या..रामप्रसादला नेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी अंकुश घेऊन गेले. ते इतरही साहित्य नेणार होेते. मात्र, शेख कुटुंबीयांनी रामप्रसादच्या आठवणी न देण्याचा चंग बांधला. त्यांनी रामप्रसादची घंटी, झुल, पोटी, कंडा मात्र दिल्या नाहीत. आता या वस्तूच लोकांच्या आठवणी बनल्या आहेत.