शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कलर डाय टेस्टने शोधणार महाबळेश्वरच्या धरणाची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 14:07 IST

वेण्णा धरणातून होत असलेली गळती शोधण्यासाठी कलर डाय टेस्ट या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. गळतीचा धरणाला कोणताही धोका नाही. मात्र, लघु पाटबंधारे व जीवन प्राधिकरण विभागाने गाफील न राहता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केली.

महाबळेश्वर : वेण्णा धरणातून होत असलेली गळती शोधण्यासाठी कलर डाय टेस्ट या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. गळतीचा धरणाला कोणताही धोका नाही. मात्र, लघु पाटबंधारे व जीवन प्राधिकरण विभागाने गाफील न राहता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केली.

वेण्णा धरणाच्या सांडव्याला लागून असलेल्या संरक्षक भिंतीला गळती लागल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. आमदार मकरंद पाटील यांनी अधिकाºयांसमवेत या धरणाची पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी ते म्हणाले, गळती कोठून होत आहे? हे निश्चित सांगता येत नाही. मात्र, गळतीची जागा शोधण्यासाठी कलर डाय टेस्ट या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च सेंटर या संस्थेमार्फत हे काम केले जाईल.

या पद्धतीमध्ये पाणबुड्या पाण्यात सोडण्यात येतात. या पाणबुड्या निरीक्षण करून गळतीची जागा शोधून काढतात. यानंतर योग्य ती उपाययोजना करून गळती थांबविली जाते. काही दिवसांत धरणाची गळती पूर्णपणे बंद केली जाईल.

या वेळी लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, जीवन प्राधिकारणचे मुख्य अभियंता एस. एन. गरांडे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गाडे, उपअभियंता व्ही. एल. कुलकर्णी, बाळासाहेब भिलारे, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, उपसभापती संजय गायकवाड, युसूफ शेख, कुमार शिंदे, दत्तात्रय वाडकर आदी उपस्थित होते.वाया जाणारे पाणी जॅकवेलमध्ये सोडणारगळतीच्या ठिकाणाची दररोज पाहणी करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा विसर्ग वाढतो का? रंग बदलतो का? पाण्याबरोबर वाहून येणारे साहित्य या सर्व बाबींचे निरीक्षण केले जाणार आहे. वाहून जाणारे पाणी वाया न घालवता ते जलवाहिनीमार्फत पुन्हा जॅकवेलमध्ये सोडण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी दिली.