शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक यांच्या वीर मातेस पाच लाखांची मदत

By admin | Updated: April 10, 2016 00:09 IST

महाराष्ट्र शासनाकडून प्रदान

सातारा : येथील सैनिक स्कूलमध्ये शनिवारी झालेल्या डिफेन्स पेन्शन अदालतीत शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर मातेस महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदतीचा पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. त्याचबरोबर अंबवडे वाघोली येथील सेवारत सैनिक शिपाई अमर साबळे यांनाही ‘मेन्शन इन डिस्पॅच’ पदक मिळाल्याबद्दल अडीच लाखांचा धनादेश देण्यात आला. या पेन्शन अदालतमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांचे अवलंबिताकडून प्राप्त झालेल्या ७३५ तक्रारी अर्जांपैकी २५८ अर्जांचे निराकरण करण्यात आले. उर्वरीत तक्रारींचे निराकरण लवकरच करण्याची ग्वाही अ‍ॅडीशनल सी. डी. ए. निरंजन कुमार यांनी दिली. यावेळी पेन्शन ई-सुविधाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पेन्शन विषयक तक्रारींबाबत टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. रक्षा लेखा प्रधान नियंत्रक व रक्षा लेखा महानियंत्रक, रक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार पी.सी. डी. ए. (पेन्शन) अलाहाबाद यांच्यामार्फत १३९ व्या पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वन रँक वन पेन्शनचा फरक अदा करणे सुलभ होण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोषागार कार्यालयातून पेन्शन घेत असलेल्या आहेत, अशा सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सैन्य सेवेतील सर्व कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर.जाधव यांनी केले. या पेन्शन अदालतीस ब्रिगेडीयर पी. एस. नायर, डिफेन्स पेन्शन अदालत आॅफिसर आशिष सेन, सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य, सी.पी.पी.सी., एसबीआय., सी.बी.आय., बेलापूर यांचे प्रतिनिधी, कर्नल राणा, एस. एस. ओ. स्टेशन हेडक्वार्टर्स, कोल्हापूर, अभिलेख कार्यालय, बीईजी., ई.एम.ई., मराठा लाईट इन्फंट्री, आर्मड कोर, महार रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट व ए.एस.सी. यांचे प्रतिनिधी, पी.सी.डी.ए. व बी.ई.जी. सेंटर यांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)