शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरला पोहण्याची अ‍ॅलर्जी : धक्कादायक चित्र--लोकमत विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:44 IST

महाबळेश्वर : ‘टाक मुटका... मार सुळका...’ असे शब्द पोहणाऱ्यांच्या तोंडी नेहमीच ऐकू येतात.

ठळक मुद्दे८० टक्के मुला-मुलींना पाण्याची भीती; पोहण्यासाठी कसलीच सुविधा नसल्याने समस्या

सचिन काकडे ।महाबळेश्वर : ‘टाक मुटका... मार सुळका...’ असे शब्द पोहणाऱ्यांच्या तोंडी नेहमीच ऐकू येतात. प्रामुख्याने ग्रामीण भागात हे शब्द आजही प्रचलित आहेत. मात्र, महाबळेश्वर याला अपवाद ठरू पाहत आहे. कारण, शहरातील तब्बल ८० टक्के मुला-मुलींना पोहताच येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, यामध्ये १० ते २० वयोगटांतील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.पोहणे हा उत्कृष्ट व्यायाम आहे. पोहताना शरीराचे सर्व स्नायू काम करतात. मन आनंदी राहते, झोपेची गुणवत्ता सुधारते, शरीरालाथंडावा मिळतो, स्नायू बळकटहोतात. पोहता येणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानले जाते. मात्र, सर्वच बाबतीच प्रगत असलेल्या महाबळेश्वरातील अनेक शाळकरी मुला-मुलींना पोहताच येत नाही.महाबळेश्वरची भौगौलिक परिस्थिती या सर्व बाबींना काही प्रमाणात कारणीभूत असावी, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. चार ते पाच महिने पडणाºया पावसामुळे घरातून बाहेर पडणे मुश्कील असते. अशावेळी पोहण्याचा प्रश्नच येत नाही. यानंतर तीन महिने कडाक्याची थंडी. उन्हाळ्यात येथील शाळांना सुटी नसते. त्यामुळे मुलांना पोहण्यासाठी फारसा वेळ देता येत नाही. त्यातच शहरात पूर्वीपासूनच पोहण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेकांना इच्छा असूनही पोहता येत नाही.दुसरीकडे ज्या मुलांना पोहता येते त्यांनी आपल्या पै-पाहुण्यांच्या गावी अथवा जिथे व्यवस्था आहे, अशा ठिकाणी पोहण्याचे धडे गिरविले आहे. पाचगणीतील काही शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांना पोहणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोहता येत नसल्याने शहरातील काही युवक व नागरिकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना आजपर्यंत अनेकदा घडल्या आहेत. असे असताना पालक व मुले पोहण्यापासून आजही चार हात लांब आहेत. ही बाब अत्यंतगंभीर असून, प्रशासनाने मुलांसाठी जलतरण तलाव खुला करणे गरजेचे बनले आहे.एकमेव तलाव १३ वर्षांपासून धूळखातमहाबळेश्वर पालिकेच्या वतीने शहरात जलतरण तलावाची उभारणी करण्यात आली. १२ जून २००४ रोजी या तलावाचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. काही काळ उपयोगात आल्यानंतर हा तलाव बंद पडला. गेल्या १३ वर्षांपासून वापराविना असलेल्या या तलावाला आता झुडपांनी वेढले आहे. पालिकेच्या वतीने डागडुजी केल्यास तो पुन्हा उपयोगात येऊ शकतो, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.पोहण्याची खूप इच्छा होती; परंतु पोहायचे कोठे हेच समजत नव्हते. शहरातील अनेक हॉटेलमध्ये जलतरण तलाव आहेत. मात्र, या ठिकाणी पोहायला शिकणे अशक्य होते. त्यामुळे महाबळेश्वरजवळ असलेल्या लिंगमळा धबधब्याच्या डोहात पोहायला शिकलो. मात्र, शेकडो मुलांना आजही पोहता येत नाही.- राहुल आरडे, युवक