शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात मातब्बरांना धक्का; महिलाराज येणार !

By admin | Updated: October 7, 2016 23:59 IST

आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट : शिवसेनेने कसली कंबर; निवडणुकीसाठी इच्छुुकांचे गुडघ्याला बाशिंग

अजित जाधव -- महाबळेश्वर पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती; परंतु या निवडणुकीमध्ये महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेनेही चांगलीच तयारी केल्याचे दिसून येत आहे. यामुळे महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समितीच्या निवडणुका अटीतटीची होणार आहे.महाबळेश्वर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे दोन गट आहेत. मागील २०१२ मधील निवडणुकीमध्ये भिलार या गटात सर्व साधारण असे आरक्षण पडले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब भिलारे या गटातून निवडून आले होते; परंतु यावेळी झेडपी भिलार गटासाठी इतर मा. महिला आरक्षण पडल्यामुळे बाळासाहेब भिलारे यांची चांगलीच गोची झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात झेडपीच्या तळदेव गटातून २०१२ मध्ये अनुसूचित जाती असे आरक्षण पडले होते. यावेळी सुरेश सपकाळ तळदेव या गटातून निवडून आले होते; परंतु या निवडणुकीत झेडपी गट तळदेव या गटामध्ये इतर मा. महिला असे आरक्षण पडल्यामुळे सपकाळ हद्दपार होणार असे दिसून येते आहे. या झेडपी गट तळदेवमधून पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. संजय जंगम यांचे पत्नी सरोज जंगम असे इच्छुक उमेदवाराच्या नावांची चांगलीच चर्चा सुरू आहे.महाबळेश्वर पंचायत समितीचे एकूण चार गण आहेत. यामध्ये भिलार या गणासाठी २०१२ मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण होते. यावेळी राजेंद्र राजपुरे निवडून आले होते; पण यावेळी भिलार या गणामध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्यामुळे या गणात ‘महिलाराज’ होणार असे दिसून येते तरीही भिलार गणामधून राजेंद्र राजपुरे यांच्या पत्नी रूपाली राजपुरे यांच्या नावाची चर्चा पाचगणी व भिलार या गावात सुरू आहे. मेटगुताड या गणामधून २०१२ या निवडणुकीत सर्वसाधारण असे आरक्षण होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सजंय गायकवाड निवडून आले होते. पण यावेळी या मेटगुताड या गणामध्ये ना. मा. प्रवर्ग असे आरक्षण पडल्यामुळे संजय गायकवाड वाडा कुंभरोशी या गणामधून प्रयत्न करणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या मेटगुताड या गणामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून क्षेत्र महाबळेश्वर येथील जीवन महाबळेश्वरकर, जयवंत शिर्के, मुन्ना वारुणकर, रमेश चोरमुले, प्रदीप कात्रट, शानवाज डांगे, अबकर शारवान यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.तळदेव या गणामध्ये मागील २०१२ या निवडणुकीत तळदेव या गणामध्ये ना. मा. प्रवर्ग असे आरक्षण होते व त्यावेळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री जंगम या निवडून आल्या होत्या; परंतु या निवडणुकीमध्ये तळदेव या गणामध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळे या भागात महिलाराज असे चित्र दिसून येत आहे. वाडा कुंभराशी या गणामध्ये मागील २०१२ या निवडणुकीत सर्वसाधारण महिला असे आरक्षण होते. त्यावेळी पंचायत समितीच्या सभापती मंगला विठ्ठल जाधव या निवडून आल्या व या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. (प्रतिनिधी)