शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरला सहा दिवसांत साठ हजार पर्यटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:18 IST

महाबळेश्वर : निसर्गाची जादूनगरी महाबळेश्वरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सहा दिवसांत साठ हजार पर्यटकांनी भेट दिल्याने परिसर गजबजून गेला आहे. ...

महाबळेश्वर : निसर्गाची जादूनगरी महाबळेश्वरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सहा दिवसांत साठ हजार पर्यटकांनी भेट दिल्याने परिसर गजबजून गेला आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे मुख्य बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप मिळालेले आहे. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी तापमान गोठल्याने वेण्णा तलाव परिसरात हिमकणांचा आनंद घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुणे, गुजरात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील पर्यटकांनी गर्दी केली आहे. अनेक पर्यटक महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीची मजा व फ्रेश स्ट्रॉबेरी लालचुटूक फळाचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत. पर्यटकांसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून, महाबळेश्वरमध्ये लिंगमळा, अवकाळी, मेटगुताड, तळदेव, तापोळा, भेकवली, माच्युतर या गावामध्ये उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी दुकानाच्या बाजू बाजूला मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी विक्रेते बसलेले दिसून येत आहे. स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी पर्यटकांची अक्षरक्ष: झुंबड उडत असल्याची दिसून येत आहे.थंडीच्या मोसमातील कडाक्याच्या थंडीमुळे दवबिंदू गोठून हिमकण दिसण्याची आजची ही चौथी वेळ असून, सलग तीन दिवस हिमकण दिसत आहे. यावर्षी ११ डिसेंबर रोजी प्रथम हिमकण तयार झाले होते. वेण्णा तलावावरील जेटी, वाहनांचे टप, स्मृतिवनातील वेली, रानफुले, झाडेझुडपे, गवताचे पठार सर्वत्रच हिमकण पाहावयास मिळत आहेत. त्याचा स्थानिकांसह पर्यटक आनंद घेत आहेत. महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदेंसह नगरसेविका आफरीन वारुणकर यांच्यासह कुटुंबिय पर्यटकांमध्ये सहभाग होता.स्टॉबेरी खरेदीसाठी गर्दीसध्या महाबळेश्वरमध्ये थंडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे आजपर्यंतची हिमकण तयार झाल्याची नोंद पाहता सलग हिमकण तयार होण्याचा विक्रम बºयाच वर्षांनंतर यावर्षी प्रथमच आला आहे, असे जाणकारांचे मत आहे. बाजरात स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु थंड वातावरण असल्यामुळे बाजारपेठेत लालफळे कमी मिळतात. ग्राहक स्टॉबेरी खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.