शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भुर्इंजच्या मदन दादांना बाबांची आॅफर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:30 IST

भुर्इंजच्या मदन दादांना बाबांची आॅफर!

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार मदन भोसले यांनी जिल्हा काँगे्रसचे नेतृत्व पुन्हा एकदा ताब्यात घ्यावे, अशी इच्छा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. ही आॅफर आल्यानंतर मदनदादांनीसुध्दा नकार न देता विचार करायला वेळ मागितला आहे. येत्या दोन दिवसांत ते आपला निर्णय कळविण्याची शक्यता आहे. कऱ्हाड येथे माजी खासदार दिवंगत प्रमिलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी मदन भोसले कऱ्हाडला बाबांच्या निवासस्थानी गेले होते, तेव्हा काही काळ या दोन नेत्यांची पक्ष बांधणीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष निवडीवरुन काँगे्रसअंतर्गत सुरु असलेला संघर्ष वेदनादायी असल्याची भावना बाबांनी यावेळी व्यक्त केली होती. जिल्हाध्यक्षपदासाठी काँगे्रसमधील सर्वसमावेशक चेहऱ्याला संधी द्यावी, अशी सर्वांचीच इच्छा असल्याने इतरांच्या नावाला विरोध होऊ शकतो, पण मदन भोसले यांच्या नावाला विरोध होणार नाही, असा बाबांचा कयास आहे. जिल्ह्यातील ११ पैकी ६ तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसनवीर, खंडाळा व प्रतापगड या तीन साखर कारखान्यांचे नेतृत्व मदन भोसले करत आहेत. हे तिन्ही कारखाने उत्तमरित्या चालवून त्यांनी नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे काँगे्रसमधील वाद अधिक चिघळण्याआधी पक्षाची घडी मदन भोसले यांनी सावरावी, अशी इच्छा बाबांनी व्यक्त केली होती.पृथ्वीराजबाबांनी व्यक्त केलेल्या इच्छेचा आदर करुन मदन भोसले यांनीही विरोध दर्शविला नाही; सध्या तीन कारखान्यांचा व्याप सांभाळत असताना जिल्हा काँगे्रसच्या संघटनात्मक कामासाठी कितपत वेळ द्यायला जमेल, हे सांगणे कठीण आहे. तरीही विचार करायला आपल्याला थोडा वेळ पाहिजे, असे सांगून आठ दिवसांत कळवतो, असे त्यांनी स्पष्ट केले होते. किसनवीर, प्रतापगड, खंडाळा या तीन सहकारी साखर कारखान्यांचे नेतृत्व मदन भोसले करत आहेत. किसनवीरचे ५२ हजार, प्रतापगडचे १५ हजार तर खंडाळा साखर कारखान्याचे १४ हजार सभासद आहेत. या तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रावर मदन भोसले यांचा प्रभाव आहे. याचा काँगे्रसला ऊर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असाच पृथ्वीराजबाबांचा आॅफर देण्यामागे विचार असावा.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधीच शकले पडून गलितगात्र झालेल्या काँगे्रसची आगामी काळात आणखी धूळधाण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा काँगे्रसच्या नेतृत्वासाठी कोणाचाही विरोध होणार नाही, असा चेहरा देणे काँगे्रसजनांना अपेक्षित होते. मदन भोसले दोन दिवसांत आपला निर्णय कळवू शकतात. साहजिकच, त्यांनी होकार दिल्यास जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. दरम्यान, मदन भोसले यांनी जून २00१ ते २00४ या अडीच वर्षांच्या कालावधीत जिल्हा काँगे्रसचे नेतृत्व केले होते. तेव्हा झेडपीत काँगे्रसचे २९ सदस्य होते. वाई, कऱ्हाड, कोरेगाव या पंचायत समिती काँगे्रसच्या ताब्यात होत्या. सध्याच्या घडीला झेडपीत सात सदस्य आहेत, तर ११ पैकी एकही पंचायत समिती ताब्यात नाही. शिवेंद्रसिंहराजेही होते काँगे्रसमध्ये...मदन भोसले काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष असताना दिवंगत अभयसिंहराजे भोसले राष्ट्रवादीत गेले होते. पण त्यांचे पुत्र आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व महत्त्वाचे मोहरे मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालीच काम करत होते. त्यामुळे ‘राजे राष्ट्रवादीत अन ‘सन’ व सैन्य काँगे्रसमध्ये,’ अशी जोरदार चर्चा पूर्वी रंगली होती. मदन भोसलेंच्याच कारकीर्दीत महाबळेश्वरचे डी. एम. बावळेकर, पाचगणीच्या लक्ष्मी कऱ्हाडकर, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी काँगे्रसमध्ये प्रवेश केला होता. सध्याच्या घडीला लक्ष्मी कऱ्हाडकर या एकमेव काँगे्रसमध्ये आहेत. मदन भोसले का होते नाराज ?२00४ च्या विधानसभा निवडणुकीत काँगे्रस व राष्ट्रवादीने आघाडी केली होती. या आघाडीतील जागा वाटपात वाई विधानसभा मतदारसंघाचे तिकिट राष्ट्रवादीला देण्यात आले होते. तिकिट नाकारले गेल्याने नाराज झालेल्या मदन भोसले यांनी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढली होती. तेव्हा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.