शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

मायणीसह अनेक ठिकाणी कमळ फुललं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 14:41 IST

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सातारा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. तसेच मायणीसह अनेक गावांमध्ये भाजपने निर्विवाद सत्ता हस्तगत केली. मायणीत दहापैकी सात जागा दिलीप येळगावकर - सचिन गुदगे गटाने पटकावल्या.

ठळक मुद्देसातारा तालुक्यात बाबा राजेंची दिवाळी !सोनगाव-जकातवाडी उदयनराजेकडे..सचिन गुदगे मायणीचे नवे सरपंच

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सातारा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. तसेच मायणीसह अनेक गावांमध्ये भाजपने निर्विवाद सत्ता हस्तगत केली. मायणीत सतरापैकी दहा जागा दिलीप येळगावकर - सचिन गुदगे गटाने पटकावल्या .  दरम्यान, सातारा तालुक्यातील सोनगाव, जकातवाडी अन् कोपर्डेसह काही गावांमध्ये खासदार उदयनराजे भोसले गटाचा झेंडा फडकला. वडूथमध्ये जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता गोरे यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला असून म्हसवे गावात संजय शेलार केवळ तीन मतांनी विजयी झाले.  क्षेत्रमाहुलीत सत्तांतर झाले असून राष्ट्रवादीच्या शिवेंद्रराजे अन् शशिकांत शिंदे गटाला आठ तर भाजपच्या संतोष जाधव गटाला सहा जागा मिळाल्या आहेत. अपशिंगेत शिवेंद्रराजे गटाची सत्ता अबाधित राहिली असून गणेश देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. आसनगावात बाबाराजे गट विजयी झाला असला तरी जकातवाडीमध्ये खासदार उदयनराजे गटाची सत्ता अबाधित राहिली. दरम्यान, अपशिंगेत संगिता निकम तर सोनगावला प्रभावती मुळीक यांना चिठ्ठीने तारले. कामेरीत मात्र भाजपचा सरपंच निवडून आल्याचे दिसून आले.   कोरेगाव तालुक्यातील बनवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळू नलगे हे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले असून आसनगांवमध्ये अनिल शिंदे पॅनेलला ७ पैकी ४ जागा मिळाल्या. करंजखोप, रणदुल्लाबाद राष्ट्रवादीकडे तर पिपोडे खुर्द, खेड (नांद.) भाजपा अन् वाघोली काँग्रेसने जिंकली आहे.   खंडाळा तालुक्यातील असवलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांना धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस औदयोगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ यांच्या गटाने सरपंचपदासह सात जागा जिंकल्या. वाई तालुक्यात किकली, काळंगवाडी व गोवेदिगर ही गावे भाजपकडे गेली असून भुईंज, कवठे, पांडे काँग्रेसकडे तर बोपर्डी राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली.फलटण तालुक्यात दुधेबावी, सुरवडीचे सरपंच काँग्रेसचे बनले. तसेच चौधरवाडी ,वडले, वाठार निम्बाळकर राष्टवादीकडे तर गिरवी भाजपाकडे गेली.