शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत मारहाण करून एकास लुटले

By admin | Updated: February 27, 2016 00:42 IST

शिवाजी क्रीडांगणावर घटना : पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा

मिरज : मिरजेत शिवाजी क्रीडांगणावर पाचजणांच्या टोळक्याने एका तरुणास मारहाण करून १४ हजार रुपये लुटले. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली. आरोपींकडून लुटीची रक्कम व दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. कुमार लक्ष्मण पवळ (वय ३०, रा. भोसरी, पुणे) हा तरुण कामानिमित्त हुबळीला निघाला होता. रेल्वेने मिरजेत आल्यानंतर रात्री हुबळीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला वेळ असल्याने कुमार पवळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शिवाजी क्रीडांगणावर गेला. तेथे बसून तो जेवत असताना, तीन मोटारसायकलींवरून पाचजणांचे टोळके तेथे आले. जेवत बसलेल्या पवळ यास गांजा ओढतोस काय, अशी विचारणा करीत त्याच्या पॅन्टच्या खिशात हात घातला. पवळ याच्या खिशात १४ हजार रूपये होते. नोटांचे बंडल काढून घेताना पवळ याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, पवळ यास मारहाण करून रक्कम लुबाडून पाचहीजण मोटारसायकलवरून पळून गेले. या घटनेबाबत कुमार पवळ याने गांधी चौक पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करीत, मारहाण करून रक्कम लुटणाऱ्या तिघांना जेरबंद केले. परवेझ ऊर्फ तबरेज बाबू तांबोळी (२४, रा. शंभरफुटी रस्ता सांगली), फारूख हुसेन बेग (३४, रा. किल्लाभाग मिरज), अजय भाऊसाहेब केटकाळे (२३, रा. कवठेएकंद, ता. शिरोळ) यांना दरोड्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांचे दोन साथीदार फरारी आहेत. गुन्ह्णासाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली व लुटलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. न्यायालयाने तीन आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. मिरजेत शिवाजी क्रीडांगणावर रात्रीच्यावेळी अंधारात व्यसनी व अंमली पदार्थांची नशा करणाऱ्यांचा व गुन्हेगारांचा वावर आहे. रात्रीच्या अंधारात येथे लूटमारीसह अनेक गुन्हे घडतात. शिवाजी क्रीडांगणावर दिव्यांची व रखवालदारांची व्यवस्था नसल्याने क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे.