शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चाकातली हवा गेल्याचे सांगत लुटमारीचा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘ओ.... काच खाली घ्या... टायरमधली हवा बघा कमी झालीये... गाडी थांबवा आधी, नाहीतर जोरात अपघात होईल...!’ असे सांगून राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने जाणाºया चारचाकीला अडवून लुटण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या घटनेची माहिती देणारी आणि टोळीपासून सावध होण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याची आॅडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘ओ.... काच खाली घ्या... टायरमधली हवा बघा कमी झालीये... गाडी थांबवा आधी, नाहीतर जोरात अपघात होईल...!’ असे सांगून राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने जाणाºया चारचाकीला अडवून लुटण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या घटनेची माहिती देणारी आणि टोळीपासून सावध होण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याची आॅडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.याविषयी अधिक माहिती अशी, गत सप्ताहात पुण्याहून साताºयाकडे कुटुंबासह येणाºया एका दाम्पत्याला खेड-शिवापूर टोलनाक्याच्या अलीकडे एक तरुण दुचाकीस्वाराने ‘ओ गाडी थांबवा, टायरमध्ये हवा कमी झालीये’ असे सांगितले.आधुनिक तंत्रज्ञानांनी सज्ज असलेल्या या गाडीत हवा कमी झाल्याचे निर्देशित केले जाते. तसे काहीही निर्देश न दिसल्याने संबंधित वाहनचालकाने या तरुणाला हात करून पुढे जाण्यास सांगितले. बराचवेळ हा युवक गाडीचा नंबर दिसू नये, म्हणून आपल्या गाडीच्या बरोबरीने गाडी चालवत असल्याचे पत्नीच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोन-तीन दुचाकी पुढे जाऊन त्यावरील तरुण मागे चारचाकी वाहन थांबतेय का? याची खात्री करू लागले.घडणाºया प्रसंगाची साखळी लावल्यानंतर आपण मोठ्या संकटात सापडण्याआधी योग्य यंत्रणांना याविषयी माहिती दिली पाहिजे, असे ठरवून या दाम्पत्याने टोलनाक्यावरील पोलिसांना माहिती दिली.गेल्या काही दिवसांत असे प्रकार घडले असल्याचा दुजोरा पोलिसांनीही दिल्याने महामार्गावरील धोकादायक प्रवास पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला आहे.सुरूर परिसरातच काही दिवसांपूर्वी प्रवाशाला कारमध्ये घेतले होते. त्यानंतर गाडी शिरवळ हद्दीत आली असता पंक्चर झाल्याचे सांगत अंधारात बॅगेतील दागिने लंपास केल्याची घटना घडली होती.