शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लोणंदला अनेक इच्छुकांचे पत्ते गुल

By admin | Updated: January 17, 2016 00:33 IST

नगरपंचयतीसाठी आरक्षण सोडत जाहीर

लोणंद : राज्य निवडणूक आयोगाने नवनिर्मित लोणंद नगरपंचायतीचा कार्यक्रम जाहीर केल्याने लोणंदच्या १७ प्रभागांची आरक्षण सोडत शनिवारी सकाळी नगरपंचायत सभागृहात वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे व खंडाळ्याचे तहसीलदार शिवाजीराव तळपे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामध्ये १७ प्रभागांमध्ये ९ महिला ८ पुरुष आहेत. त्यामुळे लोणंदमधील इच्छुक उमेदवारांच्या आरक्षणामुळे पत्ते गुल झाले आहेत. लोणंद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये काही महिन्यांपूर्वी रूपांतर झाले असून, नगरपंचायतीच्या प्रभाग व आरक्षण सोडतीमुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झाली असून, लोणंदमध्ये नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे दिसत आहे. शनिवारी लोणंद नगरपंचायत सभागृहामध्ये प्रचंड गर्दीमध्ये व अति उत्साहात प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रभाग रचना व प्रभाग आरक्षणे प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार शिवाजीराव तळपे यांनी जाहीर केले. त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती सर्वसाधारण १ या सोडत लहान मुलांच्या हातून चिठ्ठीद्वारे काढण्यात आल्या. प्रभागरचना व आरक्षणामुळे मातब्बर इच्छुकांचे पत्ते गुल झाले. ९ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने नगरपंचायत निवडणुकीमध्ये पहिला नगरसेवक होऊ इच्छित असलेल्या उमेदवारांना आपल्या प्रभागामध्ये महिलांसाठी जागा सोडावी लागणार आहे. तसेच सर्वसाधारण आरक्षण असलेल्या ४ प्रभागांमध्ये इच्छुकांची फार गर्दी होणार असून, प्रभागरचना व आरक्षण सोडतीमुळे कुठे आनंदाचे वातावरण तर कुठे नाराजीचा सूर आहे. लोणंद नगर पंचायतीसाठी १७ प्रभाग हे १८ हजार ४८० लोकसंख्येनुसार करण्यात आले आहेत. दि. १८ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान लेखी स्वरूपात हरकती प्रांताधिकारी यांच्याकडे देण्यात याव्या. यावेळी माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, सातारा लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल घाडगे, शिवाजीराव शेळके, हर्षवर्धन शेळके-पाटील, चंद्रकांत शेळके, इम्रान बागवान, शंकरराव क्षीरसागर, लक्ष्मण शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)