शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकनेते’ने फोडली कोंडी; आता इतरांकडे लक्ष!

By admin | Updated: December 15, 2015 23:26 IST

फलटण तालुका : पहिली उचल रोख स्वरूपात मिळाल्याने समाधानाचे वातावरण

नसीर शिकलगार --फलटण--लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याने गाळपास आलेल्या उसाला पहिला हप्ता १८०० रुपये दर देऊन ऊसदराची कोंडी फोडली आहे. आता इतर कारखाने काय दर देणार? याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. पहिली उचल रोख स्वरूपात मिळाल्याने ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता अंतिम दर उच्चांकी निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहेत.जिल्ह्यात उसाचे उत्पादन प्रचंड होत असते. फलटण तालुक्यातील काही भागात सतत दुष्काळ असला तरी बागायत पट्ट्यात पूर्णपणे उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे दरवर्षी पंधरा ते सोळा लाख मेट्रीक टन उसाचे उत्पादन होत असते. तालुक्यात यापूर्वी दोन कारखाने असल्याने हे दोन्ही कारखाने उसाचे संपूर्ण गाळप करून शकत नव्हते. पर्यायाने ऊस उत्पादकांना शेजारील पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस देण्याशिवाय पर्याय नव्हता. बाहेरील कारखाने ऊस उत्पादकांची किरकोळ दर देऊन बोळवण करत होते. ऊस उत्पादक शेतकरी अशा कात्रीत सापडला असताना तालुक्यात आणखी दोन खासगी कारखाने निघाले. त्यातील लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर कारखान्याने कारखाना यावर्षी चालू करताना रणजितसिंहांनी ऊस उत्पादनकांना चांगला दर देण्याचा शब्द दिला होता. या कारखान्याने पहिला हप्ता रोख स्वरूपात कोणतीही कपात न करता थेट स्वराज पतसंस्थेच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना दिल्याने ऊस उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.बाहेर गाळपासाठी जाणाऱ्या उसाचे प्रमाण कमी झाले आहे. लवकरच दुसऱ्या खासगी कारखान्याचेही गाळप सुरू होणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांची दरासाठी बाहेरील कारखानदारांकडून होणारी अवहेलना थांबणार आहे.लोकनेते कारखान्याने १८०० रुपयांचा पहिला हप्ता देत पहिल्या उचलीची कोंडी फोडली आहे. त्यामुळे इतर कारखाने आता पहिली उचल काय देणार? याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. ‘लोकनेते’मुळे इतर कारखान्यांनाही आता स्पर्धेत राहण्यासाठी दराची घोषणा करावी लागणार आहे. त्यात ‘लोकनेते’चे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी इतर कारखान्यांपेक्षा जादा दर देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा व बाजारपेठेत साखरेचे वाढत चाललेले दर पाहता इतर कारखान्यांनाही आता दराच्या स्पर्धेत उतरावेच लागणार आहे. एखाद्या कारखान्याने कमी दर दिला तर तो कारखाना भविष्यात अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे स्पर्धा लागणार आहे. मागील हंगाम ऊस उत्पादकांसाठी अडचणीचा गेला. कमी दरामुळे अनेकांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. या परिस्थितीत या हंगामात दराची स्पर्धा वाढणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. ‘श्रीराम’, ‘न्यू फलटण’ने जादा दर द्यावा ‘लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर कारखान्याने पहिला हप्ता १८०० रुपये देऊन ऊसदराची कोंडी फोडली आहे. त्यामुळे तालुक्यतील श्रीराम सहकारी साखर कारखाना व न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखान्यानेही वाढलेले साखरेचे दर पाहता पहिला हप्ता अठराशे किंवा त्यापेक्षा जादा द्यावा. अन्यात आंदोलनाचा मार्ग पत्कारावा लागणार आहे. अंतिम दरासंदर्भातही लवकरच भूमिका जाहीर केली जाईल,’ अशी माहिती फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.