शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
3
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
6
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
7
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
8
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
9
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
10
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
11
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
12
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
13
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
14
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
15
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
16
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
17
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
18
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
19
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
20
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

लोकसभेला गप्प बसलो; विधानसभेला माघार नाही !

By admin | Updated: August 4, 2014 00:26 IST

रणजितसिंह निंबाळकर : कोणत्याही परिस्थितीत आगवणे उभे राहणारच

फलटण : सत्ताधाऱ्यांमुळे तालुक्याच्या विकास खुंटला आहे. त्यांनी कधीच आघाडीधर्म पाळलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांमुळे मी माघार घेतली; पण आता विधानसभेला कोणाचे न ऐकता दिगंबर आगवणे यांना उभे करणारच ,’ अशी माहिती काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.उपळवे, ता. फलटण येथे लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखाना कार्यस्थळावर ते बोलत होते. यावेळी कारखान्याच्या कार्यकारी संचालिका अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, सुरेश पाटील, शुगर केनचे मॅनेजर ए. के. कुलकर्णी, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, महेंद्र बेडके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव फडतरे, शहराध्यक्ष अशोकराव जाधव उपस्थित होते.रणजितसिंह म्हणाले, ‘तालुक्यातील बाहेरील कारखान्यावर फलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या हितासाठी उभारत असलेल्या लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याची उभारणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. नोव्हेंबरपासून टप्प्याटप्याने कारखान्याचे गाळप ७ हजार ५०० मे. टनाने सुरू करणार आहे. फलटण तालुक्यात या हंगामात २२ लाख टन उसाची नोंद आहे. सध्या असलेले दोन्ही कारखाने ६ लाख मे. टनाच्यावर गाळप करू शकत नाहीत. त्यामुळे बहुसंख्य ऊसउत्पदकांना तालुक्याबाहेरील कारखानदारांना ऊस द्यावा लागतो. ऊसदर व गाळपाबाबत तालुक्याबाहेरील कारखानदारांकडून होणारी गळचेपी पाहता आपण जनतेच्या हितासाठी कारखान्याची उभारणी केली आहे.’या कारखान्याची आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी सर्व कामे पूर्ण होतील. नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने कारखाना सुरू होणार असून, जानेवारी महिन्यात कारखान्याचा चाचणी हंगाम घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)