शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 चंद्रकांतदादांच्या गोपनीय बैठका ,साताऱ्यातील नागरिकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:07 IST

सातारा : सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, ...

ठळक मुद्देनगरसेवकांच्या घरीही दिली भेट

सातारा : सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, बुधवारी रात्री तर त्यांनी दोन-तीन गोपनीय बैठकाही घेतल्या. तसेच भाजपच्या नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या घरी भेट देत नागरिकांशीही संवाद साधला.

सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी साताºयात झाली होती. या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना या दोन्ही बालेकिल्ल्यांना खिंडार पाडा, केंद्रात भाजपचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांना युतीचाच उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली. साताºयातील उमदेवार शिवसेनेचा असलातरी पदाधिकाऱ्यांनी स्वत: उमेदवार असल्याचे ठरवून काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर मंत्री पाटील यांनी रात्रीच्या सुमारासच साताºयातील भाजपचे नगरसेवक असणाºया धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, सागर पावशे, आशा पंडित, सिद्धी पवार, प्राची शहाणे यांच्या घरी भेट दिली. यादरम्यान त्यांनी नागरिकांशीही संवाद साधला. यावेळी विक्रम पावसकर व दत्ताजी थोरात उपस्थित होते.‘खासदार हा लोकसभेत लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी असतो; पण साताºयात तसे होताना दिसून येत नाही. याचा विचार आता नागरिकांनीच करण्याची गरज आहे,’ असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मंत्री पाटील यांनी रात्रीच्या सुमारासच साताºयात दोन-तीन ठिकाणी गोपनीय बैठकाही घेतल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत ते कोणाशी बोलले, काय चर्चा केली? याचे स्पष्टीकरण देण्यास भाजप पदाधिकाºयांनी नकार दिला. 

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक