शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुलूप.. जिजामाता बँकेला ; अन् प्रशासनाच्या तोंडालाही !

By admin | Updated: July 19, 2016 00:16 IST

अवसायक संभ्रमात : सहकार आयुक्तांकडे म्हणणे सादर केल्याची माहिती

सातारा : जिजामाता महिला सहकारी बँकेवर राज्याच्या सहकार विभागाने नेमलेले अवसायक विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांना अद्यापही बँकेचा ताबा मिळालेला नाही. बँकेला भले मोठे कुलूप असून, कर्मचारी वर्गही याठिकाणी उपलब्ध होत नसल्याने त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी सहकार आयुक्तांकडे पाठविला आहे. या प्रस्तावात त्यांनी बँकेबाबत काय कार्यवाही करायची? याबाबत मार्गदर्शन मागितले आहे. रिझर्व्ह बँकेने जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना काही दिवसांपूर्वी रद्द केला होता. यानंतर सहकार विभागामार्फत अवसायक नेमण्याची कार्यवाही करण्यात आली. सहकार आयुक्तांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग २ धनंजय गाडे यांची जिजामाता महिला सहकारी बँकेवर अवसायक म्हणून नेमणूक करण्यात आली. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर अवसायक गाडे यांनी बँकेशी पत्रव्यवहार केला. बँकेने कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत, तसेच बँकेचे रेकॉर्ड ताब्यात देण्यात यावे, अशा सूचना गाडे यांनी बँकेला लेखी कळविल्या होत्या; परंतु बँकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. दि. १२ जुलै रोजी गाडे बँकेचा पदभार घेण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी बँकेला कुलूप असल्याचे आढळून आले. बँकेचे प्रतिनिधी त्याठिकाणी उपलब्ध होत नसल्याने बँकेचे रेकॉर्ड, कर्ज ठेवींची यादी आदी उपलब्ध होत नाही. याबाबत गाडे यांनी सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यांच्या सुचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल, असे गाडे यांनी सांगितले. सहकार विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याला बँकेकडून सहकार्य होत नाही. तरीही त्यापुढे कारवाई होत नसल्याने ठेवीदारांचा प्रश्न आणखी वाढण्याची चिन्हे आहे. बँकेचे रेकॉर्ड मिळाल्यानंतर ठेवीदारांच्या याद्या ठेव विमा महामंडळाकडे सादर करायच्या आहेत. बँकेचा ताबा मिळायला जितका वेळ जाईल, तितका ठेवींचे पैसे मिळायलाही विलंब होणार आहे. बँकेवर ताबा मिळाल्यानंतर साधारणपणे सहा ते सात महिन्यांनंतर ठेवीदारांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, त्यातूनही ज्यांच्या ठेवी एक लाखाच्या आत आहेत, त्यांनाच याचे संरक्षण असणार आहे. (प्रतिनिधी)बँकेचे रेकॉर्ड मिळणे आवश्यक आहे. ठेवी व कर्जांची यादी मिळाली तर कार्यवाही करणे सोपे जाणार आहे. मात्र, अद्याप बँकेचा ताबा मिळत नसल्याने मी आयुक्त कार्यालयाचे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे.- धनंजय गाडे, अवसायक, जिजामाता महिला सहकारी बँक