शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ढोलाच्या तालावर, विळा चाले गवतावर!

By admin | Updated: December 28, 2015 00:50 IST

आनंददायी कष्ट : कास परिसरातील डोंगर पठारावर पारंपरिक पद्धतीने गवत कापणीला वेग

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरात ढोलांच्या तालावर पारंपरिक पद्धतीने गवत कापणी करण्यात शेतकरी वर्ग व्यस्त झाला आहे.पावसाळ्यात गुरांना चारा उपलब्ध करता यावा, या हेतूने कास परिसरातील शेतकरी गवत कापणी करू लागले आहेत. हे कष्टाचे काम हसत-खेळत व्हावे, कामात वेग यावा, यासाठी शेतकरी ढोल वाजवत मनोरंजन करत गवतकापणी करत आहेत. हा भाग जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर या भागात जास्त आहे. पाळीव जनावरांसाठीडोंगरपठारावर वाढलेले गवत कापताना वन्यप्राण्यांकडून हल्ले होण्याचा धोका संभवण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी वाद्ये वाजवत गवत कापणी करतात. कास परिसरातील कुसुंबीमुरा भागात सध्या गवत कापणीस वेग आला आहे. वाडीवस्तीतील शेतकरी कुटुंबे एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने ढोल-ताशाच्या गजरात गवत कापणीचे काम करत आहेत, त्यामुळे संपूर्ण परिसरात वाद्याचा आवाज घुमू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. उन्हाळ्यात डोंगरमाथ्यावर चाऱ्याची प्रचंड टंचाई असते. खडकाळ जमिनीमुळे पावसाचे पाणी वाहून जाते. परिणामी पावसाळ्यात उगवलेला चारा जास्त काळ टिकून राहत नाही. यासाठी या भागातील शेतकरी दरवर्षी पठारावर पावसाळ्यात वाढलेले गवत कापत असतात. उन्हाळ्यात याच चाऱ्यावर जनावरांचे पोषण होत असते. काही दिवसांपासून गवत कापण्याचे काम जोमात सुरू आहे. (वार्ताहर) वनभोजनाचा आनंद न्याराकास परिसरात गवत कापणीच्या कामास इर्जिक किंवा कामगत असे बोलले जाते. तसेच गवत कापणीच्या कामात एकमेकांना मदत करणे याला पैरा म्हटले जाते. काही वेळा पैशाच्या मोबदल्यातही कामे करवून घेतली जातात. ज्यांच्याकडे गवत कापणीच्या कामास जायचे आहे, त्यांच्याकडून सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. दुपारी सर्वजण शेताच्या कडेला सावलीला बसून सहभोजनाचा आनंद घेतानाही पाहायला मिळत आहेत.गवत कापणीचे काम लवकर व्हावे, यासाठी या कामात एकमेकांना सहकार्य केले जाते. शिवारात सर्व मिळून एकत्रित भोजन करतानाचा आनंद तर फारच वेगळा असतो.- ज्ञानेश्वर आखाडे, कुसुंबीमुरा