कवठे : कवठे, ता. वाई येथील शेतकरी सुरेश मारुती पोळ यांनी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका मोराच्या पिलावर उपचार करून त्याला वनविभागाच्या ताब्यात दिले.कवठे येथे डोंगर उतारावर असणाऱ्या काळा डोळा नावाच्या शिवारात सुरेश पोळ काम करीत होते. यावेळी त्यांचा जवळ असणाऱ्या एका झाडावरून खाली काहीतरी पडण्याचा आवाज आला. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. काही वेळानंतर त्याच ठिकाणी पोळ यांना कुत्री भुंकण्याचा आवाज ऐकू आला. यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चार कुत्री एका मोरावर हल्ला करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोळ यांनी कुत्र्यांना हुसकावून लावून जखमी मोर आपल्या सोबत घेऊन आले. यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भोसले यांच्याकडे जखमी मोरावर उपचार केले.कुत्र्यांच्या हल्ल्यात मोराच्या पिलाच्या डाव्या डोळ्याला जखम झाली होती. प्राथमिक उपचार केल्यानंतर सुरेश पोळ यांनी जखमी मोराला वनविभागाच्या ताब्यात दिले. सुरेश मारुती पोळ यांनी मुक्या प्राण्याला जीवदान दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर)जखमी मोरावर भुर्इंज येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पुढील उपचार करण्यात येणार आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर पिलास सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात येईल.- लक्ष्मी कांबळे, वनरक्षक
शेतकऱ्याने दिले जखमी मोराला जीवदान
By admin | Updated: April 9, 2015 00:04 IST