शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

माणसांच्या जंगलात छोटे हत्ती सुसाट!

By admin | Updated: February 2, 2015 23:58 IST

धोका ‘आ’ वासून : थोडेसे भाडे वाचविण्यासाठी पादचारी, वाहनचालकांच्या जिवाशी खेळ

सातारा : काहीतरी अघटित घडल्याखेरीज नियमांचे पालन आणि अंमलबजावणी होतच नाही, असा अनुभव असलेल्या माणसांच्या जंगलात सध्या छोटे हत्ती धोकादायकरीत्या फिरत आहेत. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक लांबीचे साहित्य छोट्याशा टेम्पोमध्ये खचाखच भरून भाडे वाचविले जात आहे. मात्र, त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या जिवाला मोठा धोका उद््भवू शकतो, हे संबंधितांच्या गावीही नाही. ‘छोटा हत्ती’ नावाने ओळखले जाणारे टेम्पो मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल झाल्यावर मालवाहतूक सोपी आणि स्वस्त झाली. मात्र, लोखंडी गज, गर्डर, पाइप, बांबू अशा टेम्पोच्या तुलनेत कितीतरी लांबीच्या वस्तूंची वाहतूक याच टेम्पोमधून केली जाऊ लागली. वाहनातून आठ, दहा... कधी तर बारा-पंधरा फूट हे साहित्य बाहेर लटकत असते. गाडीच्या धक्क्यांनी ते लपकत असते. भरगर्दीच्या रस्त्यावरून अशी धोकादायक वाहतूक सुरू असताना ती रोखण्यात यंत्रणेलाही अपयश आल्याचे दिसते.चारचाकी ‘छोटे हत्ती’ आकाराने टेम्पोपेक्षा कितीतरी मोठ्या साहित्याची वाहतूक करू लागल्यानंतर तीनचाकी मालवाहू रिक्षाचालकांचेही धाडस वाढले आहे. छोटा हत्ती उपलब्ध नसेल, अशा ठिकाणी या तीनचाकी रिक्षांमधून असे साहित्य लादले जात आहे. वाहनाच्या पुढून आणि मागूनही साहित्य बाहेर आलेले असते. त्यामुळे चालकाने गर्दीतून वाट काढताना अंदाज कसा घ्यायचा, हा प्रश्नच आहे. एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, हा त्याहूनही गहन प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांवर आहे, तशीच ती छोटे टेम्पो भाड्याने घेणाऱ्यांवरही आहे. छोट्या टेम्पोंची केवळ लांबी-रुंदीच नव्हे, तर उंचीही मोठ्या टेम्पोपेक्षा कमी असते. बाहेर लटकत असलेले साहित्य खड्ड्यांमुळे लपकत असताना दुचाकीस्वारांच्या थेट चेहऱ्याच्या उंचीपर्यंत ते खाली आलेले असते. अनेकदा धोक्यासाठी लाल कापडही साहित्याच्या शेवटच्या टोकाला बांधलेले नसते. वळणावरून टेम्पो वळविताना अंदाज आला नाही, तर मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे केवळ वाचणाऱ्या भाडेखर्चाकडे पाहायचे की सुरक्षित वाहन निवडायचे, यापैकी योग्य पर्याय विवेकानेच निवडावा लागणार आहे. (प्रतिनिधी)वाहनातून बाहेर डोकावेल, अशा साहित्याची वाहतूक करण्यास परवानगी नाही. तथापि, अशी वाहतूक करताना आढळल्यास आकारण्यात येणारा दंड अत्यल्प असल्यामुळे अशी वाहतूक दिवसेंदिवस वाढतेच आहे. ही वाहतूक धोकादायक असून, नागरिकांनी ती टाळावी. विशेषत: व्यापाऱ्यांनी आपल्या मालाची ने-आण करण्यासाठी योग्य आणि सुरक्षित वाहन निवडावे. व्यवसायापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.- संजय राऊत,  -उपप्रादेशिक परिवहन अधिकारीगेल्या काही दिवसांत अशा प्रकारची धोकादायक वाहतूक केल्याबद्दल असंख्य कारवाया करण्यात आल्या आहेत. तथापि, कारवाईची वाट न पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. अपघात झाल्यास संबंधित व्यक्ती अडचणीत सापडू शकते. वाहतूक शाखेतर्फे यापुढे अशा वाहतुकीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.- गणेश कानुगडे,  -सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखातपशीलछोटा टेम्पोमोठा टेम्पो --लांबी८ फूट१५ फूट -रुंदीसाडेचार ते ५ फूट६ फूट -स्थानिक भाडे१५० ते ३०० रु.५०० ते १००० रु.नियम काय सांगतो? --वाहनांमधून बाहेर लटकत असलेल्या सळया, गर्डर्स यामुळे २०११ या एकाच वर्षात देशभरात ११ ते १२ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. या आकडेवारीनुसार सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने वाहनातून साहित्य बाहेर येऊ देता कामा नये, असा निकाल दिला आहे. तत्पूर्वी, वाहनातून १.८ मीटर साहित्य बाहेर आले, तर चालत असे. आता तेही चालत नाही. अशा स्थितीत भरशहरातून अशी वाहतूक सुरू असताना अपघात झाल्यास संबंधिताला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. साहित्याची लांबी आणि उपलब्ध वाहने लक्षात घेता यंत्रणेकडून ही वाहतूक फारशी गांभीर्याने घेतली जात नाही; मात्र छोट्या हत्तींच्या आगमनाने वाहनाची लांबी आणि साहित्याची लांबी यातील अंतर वाढल्याने धोका अनेक पटींनी वाढला आहे.