पाचवड : पाचवड ते वाई रस्त्याकडील बाजारपेठेमध्ये स्ट्रीट लाईट बसिवण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला. सुमारे ७ लाख रुपये खर्चाच्या या कामासाठी वाई पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण यांच्या फंडामधून ४.५ लाख रुपये मंजूर करण्यात आले.
पाचवड बाजारपेठेमधील पाचवड बसस्थानकाच्या उत्तरेकडील वाढलेल्या बाजारपेठेसाठी स्ट्रीट लाईटची मागणी व्यापारी व या भागातील रहिवासी यांनी अनेकदा केली होती. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण यांच्या फंडामधून ४.५ लाख रुपये व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या फंडामधून २.५ लाख रुपये या स्ट्रीट लाईट करिता मंजूर करण्यात आले. या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण व वाई पंचायत समिती सभापती संगीता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच अर्चना विसापुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका शारदा गायकवाड, नवलाई पतसंस्थेचे चेअरमन प्रवीण गायकवाड, संचालक अशोक गायकवाड, शामराव गायकवाड, उद्योजक दत्ताशेठ बांदल, सुनील निकम, मोहन चव्हाण, महेश गायकवाड, प्रकाश काटवटे, ग्रामविकास अधिकारी चव्हाण, महावितरणचे अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : ०२ पाचवड
पाचवड (ता. वाई) येथे स्ट्रीट लाईट कामाच्या शुभारंभ करण्यात आली.