शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

विजेचा धक्का; शाळकरी मुलाचा मृत्यू

By admin | Updated: June 28, 2015 23:40 IST

नांदवळ येथील घटना : आंबे वेचताना झाला तारेला स्पर्श; कुटुंबावर शोककळा

वाठार स्टेशन : मित्रांसोबत आंबे वेचण्यासाठी गेलेल्या शिवम दिनेश चौधरी (वय ११) या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी नांदवळ ता. कोरेगाव येथे घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, शिवम हा नांदवळ येथील जिल्हा परिषद शाळेत चौथी इयत्तेत शिकत होता. शनिवारी (दि. २७) दुपारी शाळा सुटल्यानंतर तो आपल्या मित्रांसमवेत गावाजवळ असणाऱ्या उफळी नावाच्या शिवारात आंबे व जांभूळ खाण्यासाठी गेला होता. त्याच शिवारात सदाशिव भोसले यांच्या शेतात असणाऱ्या वीज वाहक खांबाच्या आर्थिंगच्या तारेला शिवमचा हात लागला. आर्थिंगच्या तारेतून वीजप्रवाहक सुरू असल्यामुळे शिवमला जोरदार वीजेचा धक्का बसला. या धक्क्याने तो जागीच बेशुद्ध पडला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ व युवकांनी घटनस्थळी धाव घेतली. नागरिकांनी शिवमला पिंपोडे बुद्रक येथील खासगी रुग्णालयात तत्काळ दाखल केले. मात्र, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने शिवमच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून रविवारी (दि. २८) रोजी सकाळी १० वाजता शोकाकूल वातावरणात शिवमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे नांदवळ गावावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)महावितरणने झटकली जबाबदारी!नांदवळ येथे शेतात असणाऱ्या वीजवाहक खांबाच्या आर्थिंग तारेला करंट कसा लागला? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात असून महावितरणच्या गलथान कारभारामुळेच ही घटना घडल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच कानावर बोट ठेवून यात महावितरणचा दोष नसल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास करून महावितरणकडून शिवमच्या कुटूंबास आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नांदवळ ग्रामस्थांनी केली आहे.आवडता विद्यार्थीशिवमच्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची आहे. त्याची आई नंदा मोलमजूरी करते. नांदवळ हे त्यांचे माहेर. सानिका, विशाल व शिवम या तीन मुलांमध्ये शिवम हा सर्वात धाकटा. तो शाळेत अत्यंत हुशार व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूनंतर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी नंदा चौधरी यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.