शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जीवनविद्या मिशनतर्फे साताऱ्यात रविवारी ‘लाईफ मॅनेजमेंट’ व्याख्यान

By admin | Updated: December 17, 2014 23:04 IST

प्रल्हाद पै यांचा कार्यक्रम : जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजन

सातारा : सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनतर्फे रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी साताऱ्यात ‘लाईफ मॅनेजमेंट सीरीज’ व्याख्यानमालेचे दुसरे पर्व आयोजित करण्यात आल्याची माहिती सातारा शाखेचे नामधारक चंद्रशेखर चोरगे यांनी दिली. जिल्हा बँकेच्या सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेत प्रल्हाद वामनराव पै मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे.जीवनविद्या मिशनने ‘उत्कर्ष एक प्रवास’ हा उपक्रम समाजात आयोजित केल्याने मुंबई, पुणे, नागपूर व बेळगाव येथील हजारो युवकांमध्ये सकारात्मक दृष्टकोन निर्माण झाला आहे. याच कार्यक्रमाचे पुढील पर्व कोल्हापूर व गोवा राज्यात सादर होणार आहे. याच संकल्पनेवर आधारित समाजातील उच्चविद्याविभूषित प्रतिष्ठीत मान्यवरांसाठी ‘लाईफ मॅनेजमेंट सीरीज’ या व्याख्यानमालेचे आयोजन ठाणे येथील गडकरी सभागृहात केले होते. पहिल्या पर्वात उपस्थित डॉक्टर्स, इंजिनिअर्स, उद्योजक, यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.व्याख्यानमालेचे दुसऱ्या पर्वाचे सातारा शहरात आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा बँकेचे सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेत प्रल्हाद वामनराव पै मार्गदर्शन करणार आहेत, असेही चंद्रशेखर चोरगे यांनीसांगितले. (प्रतिनिधी)मोबदला स्वीकारत नाहीत...वामनराव पै यांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यात जीवनविद्येवर आधारित दहा हजारांपेक्षा जास्त प्रबोधने केली. १९९८ मध्ये प्रथम अमेरिका व कॅनडा येथे जीवनविद्या तत्त्वज्ञानावरही मार्गदर्शन केले. मात्र यासाठी ते कोणतीही बिदागी घेत नसत. त्यांनी सर्वसामान्यांना जीवन जगण्याची कला शिकविणारे सत्तावीसहून अधिक ग्रंथ लिहिले असून ते हिंदी, इंग्रजी, कानडी व गुजराती भाषेमधूनही भाषांतरीत झाले आहेत. या ग्रंथांच्या लाखो प्रती संपतात, परंतु याचा मोबदला ते स्वीकारत नव्हते.