शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

लाईनमनच्या हाती ‘टेस्टर’ऐवजी चक्क शिडी!

By admin | Updated: October 6, 2015 00:43 IST

धोक्याची घंटा : वीजखांबावर चढण्यासाठी शिडीचा वापर; सुरक्षेची साधने वापरत नसल्याने धोका

जावेद खान -- सातारा --बदलत्या काळानुसार माणसाच्या जीवनशैलीत जसे बदल झाले तसेच कार्यपद्धतीही बदलली आहे. आता प्रत्येक्ष क्षेत्रात यंत्रांच्या साह्याने काम केले जात आहे. कमी श्रमात, कमी वेळेत आणि सुरक्षितपणे काम करण्यासाठी यंत्रांचा वापर केला जातो. अगदी पथदिवे बसविण्यासाठीही आता शिडीऐवजी क्रेनचा वापर केला जातो. मात्र, सातारा वीजवितरणच्या कर्मचाऱ्यांना आजही वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी शिडीचाच आधार घ्यावा लागत आहे.शहराबाहेरील वीजवाहिन्यांची दुरुस्ती करावयाची झाल्यास वीजवितरण कंपनी के्रन उपयोग करते. मात्र, शहरातील वीजवाहिन्यांची दुरुस्ती करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा शिडीचा शोध घ्यावा लागतो. ती मिळाली की दुचाकीवरून दुरुस्तीच्या ठिकाणापर्यंत कसरत करत न्यावी लागते. त्यानंतर वीजखांबाला शिडी उभी केली तर तिची उंची कमी पडते, अशा कसरतींचा खेळ कर्मचाऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.सातारा शहरात वीजखांबांवरुनच वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे वीजवाहिन्या तुटणे, फ्यूज खराब होणे, शॉर्टसर्किट होणे आदी कारणांमुळे शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित होतो. यासाठी वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सतत सतर्क राहावे लागते. सध्या मुसळधार पावसाचे दिवस सुरू आहेत. वाऱ्यामुळे वीजवाहिन्या तुटणे, वीजपुरवठा खंडित होणे, असे प्रकार सध्या घडत आहेत. एकाच खांबावरून अनेक वीजजोडण्या दिल्यामुळे तारांचा गुंता निर्माण झालेला आहे. अशा वेळी दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढणे कर्मचाऱ्यांसाठी जिकिरीचे होते. थोडासा निष्काळजीपणाही जिवावर बेतू शकतो. वीजवितरणने कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सर्व साधने पुरविली पाहिजेत. मात्र, कर्मचारी गमबूट, हातमोजे व इतर साधने वापरत नसल्याचे दिसत आहे.दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढण्यासाठी शिडीचा वापर केल्यामुळे तोल जाऊन पडण्याची शक्यता असते. तसेच वीजवाहिन्यांचा स्पर्श शरीराला होऊन धोका निर्माण होऊ शकतो. वीजखांबावर चढून दुरुस्तीचे काम करत असताना जिल्ह्यात विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. दुचाकीवरून शिडीची वाहतूकवीजपुरवठ्यात अडथळा निर्माण होत असल्यास दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढावे लागते. त्यासाठी कर्मचारी शिडीचा आधार घेतात. उंच खांबावर चढण्यासाठी २५ ते ३० फुटी शिडी लागते. एवढी लांब शिडी दुचाकीवरून घेऊन जातात, त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो.शिडीचा धोकाअनेक ठिकाणी एकाच वीजखांबावरून प्रमाणापेक्षा जास्त वीजजोडण्या दिल्यामुळे खांबावर तारांचे जाळे निर्माण झालेले आहे. शिडी लावून बिघाड दुरुस्त करताना कर्मचाऱ्याला अक्षरश: विनाआधार लटकत काम करावे लागते. टाचा उंचावून काम करताना पायाखालची शिडी सरकण्याचा धोका पत्करून कर्मचारी काम करताना दिसतात.