शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

पुन्हा पत्रे उडाले... झाडे पडली !

By admin | Updated: May 29, 2014 00:35 IST

सातारा जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही पाऊस : खंडाळ्यात नुकसान मायणीत गारा

 खंडाळा / मायणी /आदर्की : खटाव तालुक्यातील मायणी व फलटण तालुक्यातील आदर्की परिसराला बुधवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळीवारा, पाऊस आणि गारांचा तडाका बसला. यामुळे शेती पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्हीही परिसरात घरे, गोठ्यावरील पत्रे उडाले आहेत. झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्याचबरोबर खंडाळा तालुक्यात खंडाळ्यासह अनेक गावांत मुसळधार पाऊस व गारा पडल्या. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस झाला होता. झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. असे असतानाच दुसर्‍यादिवशी बुधवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस आणि गारांचा तडाका बसला आहे. मायणी, ता. खटाव परिसरातील कलेढोण, पाचवड, विखळे, हिवरवाडी, चितळी, म्हासुर्णे आदी गावांना या पावसाचा तडाका बसला आहे. सायंकाळी पाचनंतर सुमारे अर्धातास वादळीवारा, पाऊस आणि गारा पडत होत्या. सुपारी, लिंबूच्या आकाराच्या गारा या परिसरात पडल्या. त्याचबरोबर अनेक घरांवरील पत्रेही उडून गेले. झाडेही उन्मळून पडली आहेत. त्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील आदर्की परिसरातही बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. सुपारी, लिंबूच्या आकाराच्या गारा होत्या. या अवकाळी पावसामुळे टोमॅटो, डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील अनेक घरे व जनावरांच्या गोठ्यावरील पत्रेही उडून गेले आहेत. आळजापूर येथे झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. आदर्की परिसरातील वाघोशी, कोºहाळे, बिबी, कापशी, आळजापूर, हिंगणगाव, सासवड येथे वादळीवार्‍यासह पाऊस झाला. खंडाळा तालुक्यात खंडाळ्यासह हरळी, पारगाव, म्हावशी भागात सायंकाळी पाचच्या सुमारास एक तास मुसळधार पाऊस झाला. वार्‍यासह गाराही पडल्या. अनेक ठिकाणी झाडे पडली. खंडाळा येथे हॉटेलवर झाडाची फांदी पडली. वीज पुरवठा खंडीत झाला आहे. (वार्ताहर)