शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग सुरक्षित करून घेऊ

By admin | Updated: November 21, 2014 00:28 IST

पृथ्वीराज चव्हाण : कच्छी कुटुंबीयांचे केले सांत्वन

लोणंद : खंडाळ्यानजीक कंटेनर उलटून रविवारी झालेल्या अपघातात लोणंद येथील एकाच कुटुंबातील चार जणींचा व सुखेड येथील दोन जणांचा मृत्यू झाला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मृतांच्या नातेवाइकांची गुरुवारी भेट घेऊन सांत्वन केले. महामार्गावर होणाऱ्या अपघातांबद्दल तातडीने उपाययोजना करायला लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.रविवारी कंटेनर उलटून खंडाळ्यानजीक झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले होते. यात लोणंद येथील एकाच कुटुंबातील साकिना कच्छी, शबाना कच्छी, हवाबी कच्छी, सलमा कच्छी या चौघींचा तर सुखेड येथील नेहा वाघमारे व प्रमोद वाघमारे या बहीण-भावाचा दुर्दैवी अंत झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. ते म्हणाले, ‘महामार्गावर एसटी बसेस थांबविणे पूर्णपणे चुकीचे असून, त्यामुळे जर अपघात होत असतील तर हा प्रश्न गंभीर आहे. महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व रिलायन्स कंपनीची लवकरच बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्यात येईल. राज्यात सर्वच महामार्गांवर होणाऱ्या अपघातांबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.’‘खंडाळा व शिरवळ गावांलगत महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांना रिलायन्स कंपनी जबाबदार असून, त्यांच्या चुकीच्या कामामुळे व आडमुठ्या धोरणामुळेच अनेकांचे प्राण गेले आहेत. याबाबतही उपाययोजना करणे गरजेचे आहे,’ असे मत तालुक्यातील नागरिक व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजित निंबाळकर, राहुल घाडगे, गुरुदेव बरदाडे, बापुराव धायगुडे, धनाजी अहिरेकर, गनीभाई कच्छी, महंमद कच्छी, लक्ष्मण शेळके, राजूशेठ डोईफोडे, संजय जाधव, अ‍ॅड. बबलू मणेर, तुकाराम क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)