शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

माझा कुणा म्हणू मी... नेतेच पडले पेचात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:51 IST

दीपक शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बरं का.. हा माझा खंदा कार्यकर्ता... हा माझा माणूस... यांना निवडून ...

दीपक शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : बरं का.. हा माझा खंदा कार्यकर्ता... हा माझा माणूस... यांना निवडून द्या शहराचा विकास करू... जिल्ह्याचा विकास करू. सर्वसामान्य माणसाला सत्ता मिळाली पाहिजे, यासाठी स्थानिक निवडणुकीत प्रत्येक गावागावात आणि गल्ली बोळात जाऊन विनवणी करणाऱ्या नेत्यांसाठी आता हाताच्या बोटावर मोजण्या येण्याएवढेच कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहेत. त्यामुळे नेत्यांच्या प्रचारात अजून रंगच भरत नाही.नेता आणि कार्यकर्ते यांच्यातील वाढलेली दरी निवडणुकीच्या माध्यमातून तरी कमी होईल, अशी असलेली अपेक्षाही फोल ठरली आहे. ज्यांच्यासाठी सकाळी...संध्याकाळी व गरज लागली तर रात्रीही जे नेत्यासाठी फिरले ते कार्यकर्ते आता कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे माझा कुणा म्हणू मी, अशी अवस्था आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची झाली आहे.नेते आणि कार्यकर्ते हे निवडणुकीच्या काळातील अजोड गणित. या गणिताची बेरीज करत पुढे जावे लागते. ज्याची बेरीज आणि गुणाकार चांगला होतो त्याच्या गणिताचे उत्तर मोठे येते; पण जुळणी करून दिलेल्या गणितात वजाबाकी झाली की सगळं गणित फिस्कटतं. यालाच बेरजेचे आणि वजाबाकीचे राजकारण म्हटले जाते. स्थानिक निवडणुकांमध्ये नेत्याने आपल्यासाठी प्रचार करावा, ही कार्यकर्त्याची अपेक्षा असते. त्याप्रमाणे नेते दिवस-रात्र पायाला भिंगरी बांधून फिरतात. ज्यावेळी नेते येत नाहीत, त्यावेळी कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो. आता नेत्यांची बारी आहे. त्यामुळे कार्यकर्ते हटून बसले आहेत; पण तुमचीपण वेळ येणार, हे त्यांना कोण सांगणार.नगरपालिकेत निवडून यावे म्हणून ज्यांच्यासाठी उदयनराजे सकाळी... संध्याकाळी आणि गरज लागली तर रात्रीही फिरले ते आता कुठेच दिसत नाहीत. राजे तुमच्यासाठी काय पण... अशी डरकाळी फोडून मीच तुमचा सच्चा कार्यकर्ता, असा आव आणणारे बरेचजण आता गायब झाले आहेत. ‘तुम्ही काळजी करू नका, मी तुमचा प्रचार करणार,’ असे ठोस आश्वासन देण्यास कार्यकर्ते मागे राहिले नसले तरी प्रचारात मात्र पुढे कुठेच दिसत नाहीत. आता केवळ दहा ते बारा दिवस उरले आहेत. या बारा दिवसांत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन नेत्यांचा प्रचार करावा लागणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रचारात उतरण्यास सांगितले असले तरी एखादा-दुसरा आमदार वगळता कोणीही मनापासून काम करताना दिसत नाही. केवळ सभांमध्ये दिसणारे नेते दिसण्यासाठी आहेत. कामासाठी अजून कोणीही आपल्या स्थानिक पातळीवरील, गावागावातील कार्यकर्त्यांना आदेश आणि संदेश दिलेले नाहीत. त्यामुळे काही केल्या प्रचार यंत्रणा गतिमान होताना दिसत नाही.शिवसेनेने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली. यापूर्वी ते राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये होते. त्यामुळे त्यांना आपले कोणीच म्हणायला तयार नाही. भाजपचे नेते ते आता शिवसेनेचे उमेदवार असल्याचे म्हणतात तर शिवसेनावाले मूळचा भाजपचा उमेदवार असल्याने परकेपणाची जाणीव करून देतात. रिपाइंने तर प्रचाराची वेगळीच चूल मांडली आहे. त्यामुळे भाजपच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी नगरसेवकांच्या गल्लोगल्ली जाऊन बैठका घेऊन काम करण्याचे आवाहन केले; पण त्यांनी तेवढे मनावर घेतलेले नाही. नगरसेवकांना अजूनही रसद पुरवठा होत नसल्याने ते हतबल आहेत. आमचा प्रचार सुरू आहे. काळजी नको, असे आश्वासन त्यांचेही नेत्यांना आहे; पण प्रत्यक्षात ते प्रचारात कितपत सहभागी होत आहेत, हे त्यांचे त्यांनाच माहिती.उमेदवारी माघारी घेण्याची वेळ निघून गेली. आता सातारा लोकसभा मतदार संघात ९ उमेदवार रिंगणात आहेत. या नऊ उमेदवारांना पुढील १२ दिवसांत जिल्ह्याच्या कानाकोपºयात पोहोचायचे आहे. त्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून या उमेदवारांचा प्रचार सुरू होणार आहे. मग, पहाटेपासूनच तयारी. सकाळी कोणत्या गावात, नाष्टा आणि चहा कोणाकडे, दुपारी कोणत्या गावात आणि विश्रांती कोठे, संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचे नियोजन काय आणि रात्रीची सभा कुठे? या सर्व नियोजनाला कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ लागणार आहे. त्याशिवाय प्रचाराला रंगत येणार नाही. त्यातच अपक्ष असणारे उमेदवारही आपल्यापरीने गावागावांमध्ये जाऊन आपल्याला मतदान करण्यासाठी विनवणी करत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत उमेदवारांची होणारी धावपळ आणि कार्यकर्त्यांची पळापळ पाहायला मिळणे गरजेचे आहे.निवडणुका येतील आणि जातीलही; पण ज्यांनी आपल्यासाठी काही केले आणि जे करणार आहेत, त्यांचा विचार करून पक्षवाढीसाठी आणि स्वत:च्या राजकीय फायदासाठी काम होणे अपेक्षित आहे. मग ते नेत्याचे असो किंवा पक्षाचे. पण सातारा मतदार संघात सध्या वेगळेच वातावरण दिसते. एकमेकांची जिरवण्याच्या उद्देशानेच या निवडणुकीतील प्रचार पाहायला मिळतो. त्यामुळे पुढील काळात आणि यापूर्वीही दुखावलेली मने निवडणुकीच्या माध्यमातून सांधली जाण्याची आवश्यकता आहे.नगरसेवक आहे तरी कुठे...?सातारा शहरात काही नगरसेवक सध्या नजरेसच पडत नाहीत. निवडणूक झाल्यानंतर सुटीवर जाणारे अनेकजण आता ऐन निवडणुकीच्या काळातच बाहेरगावी गेल्याचे निरोप मिळत आहेत. तातडीच्या कामासाठी बाहेरगावी गेल्याचा निरोप ठेवून नगरसेवक शहराबाहेर असल्याचे अनेकजण सांगतात. निवडणूक आहे म्हणून शहरातील समस्या संपलेल्या नाहीत. तरी देखील निवडणुकीत काहीच काम नसल्याने त्यांनी टूर केली आहे.दारात एक; घरात एक प्रचारनिवडणुकीत एकमेकांची उणी-दुणी काढल्यामुळे आता प्रभागात एकत्र फिरण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे प्रत्येकजण मी स्वतंत्रपणे प्रचार करणार, असे सांगत आहे. कधीतरी कुठेतरी जास्त ऊन नाही, याचा अंदाज घेऊन एखादा कार्यकर्ता पत्रक वाटताना दिसतो; पण दारात एक आणि घरात एक जाऊन दुसरेच सांगत असल्यामुळे मतदारही गोंधळात पडले आहेत.