शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या पुस्तकांमुळं गटशिक्षणाधिकाऱ्यांना ‘धडा’

By admin | Updated: July 15, 2016 22:38 IST

तब्बल महिन्यानंतर पुस्तके हातात : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संबंधितांना तत्काळ नोटीस--लोकमतचा दणका!

नितीन काळेल --सातारा -शाळा सुरू होऊन तब्बल एक महिना झाला तरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तकच मिळाले नाही, हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी संबंधित तालुक्यातील चार गटशिक्षणाधिकाऱ्यांना खुलासा करण्याची नोटीस पाठविली आहे. याप्रकरणात संबंधितांनी पुस्तकाची आॅनलाईन मागणीच केली नसल्याचे कारण पुढे आले आहे. दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, लवकरच सर्व पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत. याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. शाळा सुरू होण्यापूर्वी तशी मागणी करणे आवश्यक असते. तरच शाळा भरताना ही पुस्तके संबंधित शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात; मात्र यावर्षी सातारा जिल्ह्यात पुस्तके मिळाली. पण, चार तालुक्यांत तीन वर्गांची हिंदी विषयाची पुस्तके मिळाली नाहीत. याबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतली. त्यानंतर पुस्तके न मिळण्यामागचे कारण समोर आले. तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत किती विद्यार्थी आहेत, किती पुस्तकांची आवश्यकता आहे, त्याची आकडेवारी घेऊन आॅनलाईन मागणी करावी लागते. यावर्षी कऱ्हाड, पाटण, खटाव आणि खंडाळ्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी प्रथमदर्शनी पाचवी, सहावी आणि सातवीच्या हिंदी सुलभभारती या विषयाच्या पुस्तकांची मागणी केली नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांना आढळून आले. त्यांनी चार तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना सात दिवसांत खुलासा करा, अशा आशयाचीच नोटीस काढली आहे. त्यानंतर देशमुख यांनी या प्रकरणात संबंधितांशी चर्चा करून पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत कशी लवकर पोहोचतील, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर गुरुवारीच एक वाहन पुस्तके आणण्यासाठी कोल्हापूर येथे गेले होते. त्यामुळे महिन्यानंतर हातात हिंदी विषयाचे पुस्तक पडत आहे. पुस्तके न मिळालेले विद्यार्थी...चार तालुक्यांतील विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत. यामध्ये पाचवी १५ हजार ८६५, सहावी ८ हजार ७३१ आणि सातवी ५ हजार ८४९ असे विद्यार्थी आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना दोन दिवसांत पुस्तके मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी पुस्तके मिळाली...मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांच्या कार्यवाहीनंतर शुक्रवारी खटाव आणि पाटण तालुक्यांत पाचवीची हिंदी विषयाची पुस्तके प्राप्त झाली आहेत. तर कऱ्हाड तालुक्यात पुस्तके पोहोच करण्याची कार्यवाही सुरू होती, अशी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याचे वृत्त मी ‘लोकमत’मध्ये वाचले. त्यानंतर माहिती घेतली असता संबंधितांनी हिंदी विषयाच्या पुस्तकांची आॅनलाईन मागणी केली नसल्याचे समोर आले. त्यामुळे चार गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस काढली आहे. येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील. - राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद