शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसदादाने दिले विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे

By admin | Updated: July 27, 2015 00:18 IST

पालकांमधून समाधान : टवाळखोरांवर वचक; औंध बसस्थानक, महाविद्यालय परिसर बनला भयमुक्त

औंध : खटाव तालुक्यातील औंध हे विद्येचे माहेरघर आहे. शिवाय पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे दररोज पर्यटक व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. मात्र काही सडकसख्याहरींकडून कॉलेज सुटल्यानंतर बसस्थानक परिसर, कॉलेज आवारात स्टंटबाजी केली जात होती, त्यामुळे विद्यार्थिनींना असुरक्षित वाटत होते. याबाबत औंध पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बसस्थानकात थांबून चांगलेच शिस्तीचे धडे दिले.कॉलेज सुटल्यानंतर औंध बसस्थानक परिसरात रोडरोमिओ, मोटारसायकल रायडर्स स्टंटबाजी करत असल्याचे प्रकार सुरू होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक्ष उदय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांनी कॉलेज परिसर, बसस्थानक परिसरावर लक्ष ठेवून रोडरोमिओ, रायडर्सवर चांगलाच वचक निर्माण केला आहे. भयमुक्त वातावरण निर्माण केल्यामुळे औंधसह शेजारी खेड्यापाड्यातील पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, एसटी बसमध्ये चढताना ढकलाढकलीचे प्रकार होत असतात. यातून वादावादी होऊन त्याचे पर्यवसान भांडणात होते. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, यासाठी हवालदार प्रशांत पाटील यांनी बसस्थानकात थांबून बसमध्ये चढताना प्रथम विद्यार्थिनी व नंतर विद्यार्थी अशी शिस्त लावली आहे. यामुळे विद्यार्थिनींनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत. (वार्ताहर)वाहतूक पोलीस प्रशांत पाटील यांनी सडकसख्याहरींवर चांगलाच वचक निर्माण केल्यामुळे चांगली शिस्त लागली आहे. हा उपक्रम असाच चालू राहावा.- मुराद मुलाणी, हॉटेल व्यावसायिक