‘टिळक’चा बारावीचा शंभर टक्के निकाल
कऱ्हाड : येथील टिळक कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे यांच्या हस्ते झाला. महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. विज्ञान शाखेत निकिता राशीनकर, समृद्धी गायकवाड, श्रावणी कदम, वाणिज्य शाखेत अस्मी मिरजकर, जाकिरा पठाण, अंकिता पाटणकर आणि कला शाखेत तुबा कुरेशी, सिद्दीका बागवान व मयुरी गुंडकर, मुस्कान संदे यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य गोकुळ अहिरे, उपप्राचार्य धनाजी देसाई, पर्यवेक्षक राजेश धुळगुडे, प्रा. शांतीनाथ मल्लाडे, प्रा. सुनीता कोळी, प्रा. भाग्यश्री देशमाने, प्रा. ज्योती पाटील, प्रा. कविता गायकवाड आदी उपस्थित होते.
माई ट्रस्टतर्फे बाधितांना मदत
कऱ्हाड : किवळ (ता. कऱ्हाड) येथील माई चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शिराळा तालुक्याच्या पश्चिमेकडील पुराचा फटका बसलेल्या जळकेवाडी, खोतवाडी गावांना मदतीचा हात देण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष व ट्रस्टच्या संस्थापक, अध्यक्ष संगीता साळुंखे यांनी मदत देऊन महिलांना साड्यांचे वाटप केले. यावेळी सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संजय थोरात, वसंत पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत शिंदे, डॉ. कुंभार, प्रकाश पाटील, विश्वासराव पाटील, हिम्मतराव नायकवडी, प्रतापराव शिंदे, विठ्ठल पेजे, समीर मुलाणी उपस्थित होते.
एस. टी. डेपोमार्फत धनाजी देसाईंचा सत्कार
कऱ्हाड : शिक्षण मंडळ, कऱ्हाडच्या टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी धनाजी देसाई व पर्यवेक्षकपदी राजेश धुळुगडे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारामार्फत वरिष्ठ आगार व्यवस्थापक विजयराव मोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य देसाई यांनी एस. टी.च्या कामात योगदान दिले आहे. उपप्राचार्य देसाई व प्रा. धुळुगडे यांनी एस. टी. डेपोने केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले. यावेळी एस. टी. वाहतूक निरीक्षक किशोर जाधव, कार्यशाळा अधीक्षक सुप्रिया पाटील, डेपो लेखाकार प्रकाश भांदिर्गे, वाहतूक नियंत्रक अनिल सावंत, अनिल बामणे, सुरज पाटील, मन्सूर सुतार यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. वरिष्ठ लिपिक सचिन महाडिक यांनी प्रास्ताविक केले.