शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देवदरी घाटात बिबट्या आला रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:09 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर - वडूज रस्त्यावरील अंभेरी येथील देवदरी घाटात बिबट्या दिसल्याच्या वावड्या वाहनधारकांकडून उठवल्या जात आहेत. ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर - वडूज रस्त्यावरील अंभेरी येथील देवदरी घाटात बिबट्या दिसल्याच्या वावड्या वाहनधारकांकडून उठवल्या जात आहेत. मात्र, वन विभागाने या वावड्यांचे खंडन करून तो प्राणी तरस असल्याचे म्हटले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अंभेरी येथील देवदरी घाट परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. एका वाहनधारकाने गाडीतूनच रात्रीच्या सुमारास घाटातील रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या प्राण्याचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याबरोबरच फोटोमधील प्राणी हा बिबट्याच असल्याचा दावा संबंधीत वाहनधारकाने केला आहे. फोटो दूर अंतरावरील आणि अंधारातील असल्यामुळे प्राण्यांची ओळख फोटोतून अचूकपणे होत नाही. परंतु सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सदर मेसेज व्हायरल झाल्यामुळे नागरिकांत कुतुहलाबरोबरच भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, याबाबत रहिमतपूर वनरक्षक नवनाथ कोळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘या परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचे स्पष्ट केले. तसेच यापूर्वीही देवदरी घाट परिसर, अपशिंगे व पवारवाडी या भागातील काही शेतकऱ्यांनी शेतातून ये-जा करताना रात्रीचा बिबट्या दिसला असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्रए त्यावेळी पाहणी केली असता तरसाच्या पायांचे ठसे दिसून आले होते. त्यामुळे सध्या समाजमाध्यमांवर जो काही फोटो आणि माहिती पसरवली जात आहे. तो प्राणी बिबट्या नसून तरस आहे. शेतकरी व वाहनधारकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.’

फोटो : ११रहिमतपूर

अंभेरी, ता. कोरेगाव येथील देवदरी घाट परिसरात रात्री दिसून आलेला प्राणी बिबट्या असल्याच्या वावड्या उठत आहेत. (छाया : जयदीप जाधव)