शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लेंगा-शर्ट, टोपी घालून लावला खुनाचा छडा..!

By admin | Updated: October 16, 2015 22:44 IST

वडापाव खाऊन टेहाळणी : दाढीचे खुंट वाढवून गर्दूल्ल्याचे सोंग

दत्ता यादव -- सातारा पोलिसांना घटनास्थळी प्रत्यक्ष साक्षीदार अथवा एकही पुरावा सापडत नाही. त्यावेळी अशा गुन्ह्याची उकल न होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच मग पोलिसांना स्वत:च्या वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून गुन्हेगारापर्यंत पोहोचावे लागते. असाच काहीसा प्रकार वापरून स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार मोहन घोरपडे यांनी राजवाड्याजवळ घडलेल्या खून प्रकरणाचा छडा लावला. घोरपडे यांनी सलग चार दिवस खाकी वर्दी उतरून लेंगा-शर्ट, टोपी, असा वेश परिधान केला. एवढेच नव्हे, तर दाढीचे खुंट वाढवून त्यांनी गर्दूला असल्याचेही भासवले. वेळप्रसंगी भेळ, वडापाव खाऊन दिवसभर अड्ड्यावर फिरून खून प्रकरणाचा छडा लावल्याने इतर प्रकरणांमध्ये कसा तपास करावा, हे घोरपडे यांनी केलेल्या तपासातून इतर पोलिसांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.राजवाड्याजवळ सहा दिवसांपूर्वी दिलीप कदम (वय ५४, रा. वाघळी पोस्ट बामणोली) यांचा अज्ञातांनी खून केल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी त्यांच्या टीमला सूचना देऊन वेगवेगळ्या पातळीवर माहिती घेण्यास सांगितले. या टीममध्ये मोहन घोरपडेही होते. ज्या ठिकाणी खून झाला. ती जागा गर्दुलांचा अड्डा असल्याचे घोरपडे यांना समजले. दिवसा आणि रात्री त्या ठिकाणी बरेचजण ‘तलफ’ भागविण्यासाठी येत असल्याचेही आणखी माहिती मिळाली. त्यामुळे घोरपडे यांनी सलग चार दिवस खाकी वर्दी उतरून लेंगा-शर्ट, टोपी, असा वेश परिधान केला. दाढीचे खुंट वाढवून त्यांनी गर्दूला असल्याचेही भासवले. बुधवारी रात्री दोन गर्दुले त्यांच्या शेजारी बसले होते. दिलीप कदम यांना रोहित आणि शांतारामने कसे मारले, याची चर्चा ते करत होते. त्या दोघांच्या बोलण्यातून आरोपींची नावेही समजली. त्यावेळी गर्दुले सांगत असलेले आरोपी सराईत असल्याचे समजताच पोलीस खात्याने आरोपींना उचलले. पोलीस असल्याची ओळख सांगून अशा प्रकरणात माहिती मिळण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे त्यांनी वेशांतर करून त्या ठिकाणी टेहाळणी करण्याचा निर्णय घेतला. लेंगा-शर्ट, टोपी घालून त्यांनी त्या ठिकाणी बसण्यास सुरुवात केली. हातात भेळ, दाढीचे वाढलेले खुंट यामुळे त्यांना कोणी पोलीस आहे, हे ओळखणे शक्यच नव्हते.