शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोणंदच्या पीचवर विधानसभेची तयारी

By admin | Updated: April 11, 2016 00:39 IST

लोणंद : शिवसेनेची रणनीती निवडणुकीसाठी अवसानघातकी; भाजपशी युतीचा प्रस्ताव धुडकावला

दशरथ ननावरे -- लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला मित्रपक्ष भाजपाशी युतीचा प्रस्ताव धुडकावत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक लोणंदमध्ये सेनेची अल्प ताकद असतानाही घेतलेल्या या निर्णयामागे राजकीय समीकरणे लपलेली आहेत. लोणंद नगरपंचायतच्या पीचवर गटबांधणी करून विधानसभेची तयारी करण्याची गणिते शिवसेनेने आखल्याचे मानले जात आहे. मात्र, सेनेची ही रणनीती नगरपंचायतीसाठी अवसानघातकी ठरणार आहे. लोणंदच्या पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक लढतीत शिवसेना-भाजप मिळून सक्षम तिसरा पर्याय उभा करतील, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र, निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्ही पक्षांत कोणत्याही नेत्यांनी चर्चा केल्या नाहीत. वस्तूत: दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची ध्येयधोरणेच अवलंबण्याशिवाय स्थानिकांना पर्याय उरला नाही. याचेच पर्यवसान निवडणूक स्वतंत्र लढण्यात झाले. या संपूर्ण घडामोडीत स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेतल्याने शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनेलसाठीही मोठी धावपळ करावी लागल्याचे दिसून येते. त्यातच ज्यांच्या नेतृत्वाखाली लोणंदची निवडणूक लढायची ते तालुकाप्रमुख चंद्रकांत शेळके आणि शहरप्रमुख रवींद्र क्षीरसागर या बिनीच्या शिलेदारांनीच सेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपा आणि राष्ट्रवादीचा रस्ता धरला. त्यामुळे शिवसेनेचा भगवा कोणाच्या हाती द्यावा, अशी परिस्थिती सेनेच्या वरिष्ठांवर ओढावली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत उमेदवारांची शोधाशोध करावी लागल्याने १७ प्रभागांपैकी केवळ नऊच प्रभागांत त्यांना उमेदवार मिळाले आहेत. त्या मानाने भाजपाने चौदा प्रभागांत उमेदवार देऊन आपण लोणंदमध्ये सेनेपेक्षा वरचढ आहोत, हे दाखवून दिले आहे.शिवसेनेने नऊ प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. भाजपासोबत युती झाली नाही. दोघांनीही नगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किमान सेनेची व्होटबँक अबाधित ठेवून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. पक्षाच्या ध्येयधोरणासाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा मात्र बळी गेला असल्याचे समोर आले आहे.शिवसेनेची भूमिका यशस्वी होणार का ?लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची ‘एकला चलो रे’ ची भूमिका कितपत यशस्वी करणार, हे पुढील काळच ठरवणार आहे. वास्तविक लोणंदमध्ये शिवसेनेची ताकद अल्प आहे. असे असतानाही शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयामागे राजकीय समीकरणे लपलेली आहेत, असे राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.