शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शिकू इतिहास... घेऊ स्वच्छतेचा ध्यास !

By admin | Updated: June 15, 2017 22:45 IST

शाळांमध्ये किलबिलाट : ‘लोकमत’च्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत...

स्वच्छ शाळा... स्वच्छ सातारा... शाळेच्या पहिल्याच दिवशी सातारा व कऱ्हाड शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचे ‘लोकमत टीम’च्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ शाळा... स्वच्छ सातारा...’ असा संकल्प घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पहिल्या दिवशी ‘लोकमत’ची टीम पोहोचली. शहरातल्या शाळा-शाळांत आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी दिल्या शुभेच्छा... गेली सहा वर्षे सातत्याने हा उपक्रम राबवत असल्याबद्दल सर्वच शाळांनी ‘लोकमत’चे आभार मानले.लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गुरुवार १५ जून... शाळेचा पहिला दिवस सातारा शहरातील सर्व विद्यार्थ्यांनी हा दिवस ‘लोकमत’च्या साथीने उत्साहात साजरा केला. सातारा व कऱ्हाड शहरातील तब्बल ५० शाळांमध्ये ‘लोकमत बालविकास मंच’च्या वतीने हर्षोल्हासात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांनी पुस्तकातील ज्ञानासोबतच कला, क्रीडा, व्यायाम, स्पर्धा परिक्षा अशा विविध क्षेत्रात यशाचा आलेख उंचावणे हा ‘लोकमत’चा उद्देश आहे. त्याअंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्याची आली होती. काही ठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती तर काही शाळांत फुगे बांधण्यात आले होते. मुलेही छान पोषाखात आली होती. सोबत पालकही होते. अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात ‘लोकमत’च्या विनंतीवरुन प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव उपस्थित राहिल्या होत्या. त्यांनीही मुलांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि ‘लोकमत’ गेली ६ वर्षे सातत्याने राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल ‘लोकमत’चे विशेष कौतुक केले.