खटाव :अयोध्या येथील राम मंदिर उभारणीसाठी खटाव गावामध्ये निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ २६ जानेवारीला लोकनियुक्त सरपंच नंदकुमार वायदंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी भाऊराव कुदळे, सुहास जोशी, उपसरपंच अमर देशमुख, भालचंद्र देशपांडे, महेश काळे, सचिन मोरे, गणेश कर्णे आदींची प्रमुख उपस्थिती होती. महासागरावर सेतू बांधण्याच्या कामात लहानशा खारीने जसा वाटा उचलला होता तसाच या श्रीराम मंदिर उभारणीच्या पुण्य यज्ञात समाजातील प्रत्येक घटकांचा सहभाग व सहकार्य असणे गरजेचे आहे. या सामाजिक भावनेतून भगवान श्रीराम मंदिर निर्माणसाठी सकल समाजाला आपल्या परीने शक्य होईल तेवढे सात्विक दान करण्याचा व सहयोग करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी सर्व रामभक्त कार्यकर्ते उपस्थित होते.
कॅप्शन :अयोध्या येथील राम मंदिर उभारणीसाठी खटाव गावामध्ये निधी संकलनाचा शुभारंभ करताना सरपंच नंदकुमार वायदंडे,भाऊराव कुदळे,सुहास जोशी व इतर
(आवश्यक वाटल्यास)