सातारा : महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज मार्फत आनेवाडी टोल नाका येथे ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ झाला. यावेळी पोलिसांनी वाहन धारकांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन केले.
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस उप अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक राजन सस्ते, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे विभाग यांचे मार्गदर्शनानुसार महामार्ग पोलीस केंद्र भुईंज हद्दीमध्ये राबविण्यात येणाऱ्या ३२ वा रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात आनेवाडी टोल नाका येथून करण्यात आली आहे.
यावेळी रिलायन्सचे रिजनल हेड अंकित भाटिया यांचे हस्ते महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाची फित कापून रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महामार्ग पोलीस केंद्र भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, सातारा हायवे मॅनेजर संकेत गांधी, आनेवाडी टोल मॅनेजर रघुवीरसिंग, भुईंज टॅपचे अंमलदार, हायवे पेट्रोलिंग स्टाफ, टोल नाका येथील कर्मचारी, वाहन चालक, नागरिक उपस्थित होते. त्याचप्रमाणे उपस्थित वाहन चालक, नागरिकांना वाहतूक मार्गदर्शक पत्रके वाटप करण्यात आली. आनेवाडी टोल नाका येथे वाहन चालकांना थांबवून त्यांना इंटरसेप्टर वाहनाची माहिती देण्यात आली. ज्या वाहनांना रिफ्लेक्टर नाहीत अशा वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. तयार करण्यात आलेला चित्ररथ महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये फिरवण्यात येणार असून त्याचबरोबर ऑडिओ संदेशाच्या माध्यमातूनसुद्धा नागरिकांना वाहतूक सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी दिली.
३१रस्ता सुरक्षा
फोटो ओळ : आनेवाडी टोलनाका येथे वाहनधारकांना वाहतूक मार्गदर्शक पत्रकांचे वाटप करण्यात आले.