शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकवृंदामध्ये ‘हास्याचा कल्लोळ !’

By admin | Updated: July 6, 2014 23:19 IST

सातारा : दीपक देशपांडेंच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची दाद

सातारा : कधी कलाकारांचे आवाज काढून, कधी विनोद, गमती-जमती सांगून तर कधी माणसांच्या स्वभावाचे वर्णन करून हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी कॉमेडी शो ‘हास्यसम्राट’ कार्यक्रमात हास्याचा कल्लोळ निर्माण केला. सुमारे तीन तास रंगलेल्या कार्यक्रमाला शिक्षकांनीही तितकाच प्रतिसाद दिला. त्यामुळे कार्यक्रम आणखी उंचीवर गेला.येथील शाहू कला मंदिरमध्ये ज्ञानदानासारख्या पवित्र कार्यात विद्यार्थी घडविणाऱ्या गुरूजनांसाठी ‘लोकमत’ने प्रा. दीपक देशपांडे यांचा कॉमेडी शो ‘हास्यसम्राट’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व ‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विजय पोवार, अवृत्तीप्रमुख सचिन जवळकोटे, विस्तारअधिकारी एस. के. देशमाने, रूपेश लाहोटी, अमित बोडके, वसंत जोशी, जी. एस. देवकर, रियाज शेख, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मंगेश मुंद्रावळे, विश्वनाथ गायकवाड, संजय जाधव, नितीन गाडेकर, श्रीमंत शेळके, डॉ. महामुनी, सोनाली जाधव, संचिता तरडे आदी उपस्थित होते.सुमारे तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमात हास्याचेच फवारे उडाले. त्यामुळे उपस्थित सर्वजण सर्व ताणतणाव दूर ठेवून कार्यक्रमात रंगून गेले. प्रा. देशपांडे यांचा साताऱ्यात झालेला हा आतापर्यंतचा १२२८ वा कार्यक्रम होता. त्यांनी सुरुवातीलाच माझे कार्यक्रम हे लंडन, वॉशिंगटन, दुबई, दिल्ली, दुबई अशा छोट्या शहरांत झाल्याचे सांगून हास्यकल्लोळास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी विविध आवाज व विनोद सांगून कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले. बसस्थानकावरील कंट्रोलरचा आवाज, डॉक्टरांची भाषा याचे हुबेहूब आवाज काढून सर्वांनाच हसविले. मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या आवाजाला तर टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला. यावेळी जणू काही आपण निळू फुले यांचा चित्रपट पाहत आहोत की काय, असे सर्वांनाच वाटून गेले. अभिनेते सूर्यकांत यांचाही आवाज त्यांनी काढला. हा आवाजही सर्वांनाच आवडला. कन्नड चित्रपटातात बोलतात कसे हे देशपांडे यांनी सांगितले. त्यालाही उपस्थितांचा प्रतिसाद मिळाला. आकाशवाणी केंद्रावरील आवाज तसेच ‘आपकी पसंद’ कार्यक्रमात आपल्या आवडीचे गीत सांगण्यासाठी फोन केल्यावर होणारी विचारपूस व गंमत-जंमत त्यांनी सांगून हास्याचा सागर निर्माण केला.कानडी, तेलगू मिश्रित मराठीमुळे होणारी शब्दांची फेकही प्रा. देशपांडे यांनी सांगितली. तेलगू बोलताना ‘थ’ चं त आणि ‘ध’चं द कसं होतं ते विविध संवादातून सादर केले. गाव बदललं की भाषा बदलते, असे सांगून त्यांनी लातूर, कोल्हापूर तसेच पुणे येथील नागरिकांच्या स्वभावाचे नमुने पेश केले. या कार्यक्रमाचे सहप्रायोजकत्व मुंद्रावळे क्लासेस, पंकज क्रिएशन्स, देवकर क्लासेस, स्मार्ट किडस्, अ‍ॅबॅकस सेंटर (कर्मवीर कोचिंग क्लासेस), चंद्रविलास भुवन, होम रिवाईज, सोनी कस्टम्स अ‍ॅण्ड वॉचेस, प्रकृती जियो फ्रेश यांनी स्वीकारले होते. (प्रतिनिधी)