शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तीस वर्षांत तब्बल साडेचार कोटी ग्रंथांची छपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:15 IST

शंकर पोळ ।लोकमत न्यूज नेटवर्ककोपर्डे हवेली : संतांचे वाड्मय घरोघरी पोहोचावे आणि त्या वाड्मयाचा लाभ सर्वांना मिळावा, या हेतूने संत वाड्मय प्रसारक मंडळ गेल्या तीन दशकांपासून काम करत आहे. त्याच्या छपाईचे काम कोपर्डे हवेली येथील वैष्णव सदनमध्ये सुरू असते. तयार होत असलेल्या ग्रंथावर प्रकाशन म्हणून कोपर्डे हवेली गावाचा पत्ता असल्याने ...

शंकर पोळ ।लोकमत न्यूज नेटवर्ककोपर्डे हवेली : संतांचे वाड्मय घरोघरी पोहोचावे आणि त्या वाड्मयाचा लाभ सर्वांना मिळावा, या हेतूने संत वाड्मय प्रसारक मंडळ गेल्या तीन दशकांपासून काम करत आहे. त्याच्या छपाईचे काम कोपर्डे हवेली येथील वैष्णव सदनमध्ये सुरू असते. तयार होत असलेल्या ग्रंथावर प्रकाशन म्हणून कोपर्डे हवेली गावाचा पत्ता असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात ग्रंथांबरोबर गावाचे नाव पोहोचले आहे.व्यसनमुक्ती संघाचे संस्थापक अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर्डे हवेली येथे वैष्णव सदनची निर्मिती झाली. १९८७ मध्ये वारकरी प्रसारक मंडळ यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. कोपर्डे हवेली येथील या वैष्णव सदनमध्ये गेल्या तीस वर्षांत लहान-मोठे असे सुमारे ४ कोटी ५० लाख ग्रंथांची छपाई करून ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्याची विक्री केली जात आहे. वर्षाला सुमारे १८ लाख वाड्मयीन ग्रंथ तयार करून त्याची विक्री होते.छपाई केलेले संत वाड्मय आळंदी, पंढरपूर, पुणे, देहू आणि वैष्णव सदन येथे विक्रीसाठी ठेवले जाते. तसेच याठिकाणी गायन, तबला वादन, कीर्तन आदींसाठी मार्गदर्शन केले जात होते; पण छपाईच्या व्यापामुळे हे मार्गदर्शन आता कºहाड येथील मठामध्ये सुरू आहे. संत वाड्मय छपाईमुळे गरजू लोकांना रोजगार मिळाला आहे. वैष्णव सदनमधील सर्व जबाबदारी हे सुभाष पाटील पाहत असतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत त्यांचे काम सुरू असते. वारकरी संप्रदाय हा जगभर पसरल्याने वाचकांची संख्या जगभर आहे.भजनी मालिका प्रकाशितनामदेव अप्पा शामगावकर यांची प्रसिद्ध झालेली नित्यनियम भजनी मालिका याच ठिकाणाहून प्रकाशित केली जाते. अनेक वारकरी भजनी मालिकेचा दैनंदिन वापर करतात.