कोल्हापूर : कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी विमानसेवा पुरविण्यासाठी तयारी दर्शविलेल्या सुप्रीम एव्हिएशन कंपनीने सेवा सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या तीस मंजुरी, परवानगी मिळवल्या आहेत. राज्य शासनाच्या पातळीवरील सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. नागरी उड्डाण संचालनालयाचे (डीजीसीए) व नागरी विमान मंत्रालयाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) मिळविणे आवश्यक आहे. या प्रक्रिया लवकर पूर्ण करून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शुक्रवारपासून (दि. १५) विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने कंपनी व खासदार धनंजय महाडिक यांचे प्रयत्न सुरू आहेत.तीन वर्षांपासून बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी जूनमध्ये खासदार महाडिक यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सुप्रीम एव्हिएशन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिवाय, कोल्हापुरातील उद्योजक, व्यावसायिकांशी चर्चा केली. ‘सुप्रीम’ने कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी नियमित कमी आसन क्षमतेची विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर १५ आॅगस्टला विमानसेवा सुरू करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र’, परवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यात ‘सुप्रीम’ ने सेवा सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या तीस मंजुरी, परवानगी मिळवल्या. डीजीसीए आणि नागरी विमान मंत्रालयाची ‘एनओसी’ मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या एनओसी येत्या दोन-तीन दिवसांत मिळाली, तरच स्वातंत्र्यदिनाचा टेक आॅफसाठी मुहूर्त साधता येणार आहे. दोन दिवस आधी ‘नाईट लॅँँडिंग’ ची सुविधाकोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी विमानतळाचे अधिकारी मनोज हाटे यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यावर कोल्हापुरातून नियमित विमानसेवा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी संबधित सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.कोल्हापूरच्या विमानतळाचा केंद्र सरकारने ‘लो कॉस्ट’ विमानतळांच्या विकासाच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे येथे विमानतळाचे नियोजित विस्तारीकरण, नाईट लँडिंगची सुविधा लवकरच उपलब्ध होतील. राज्य शासनाच्या पातळीवरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. डीजीसीए आणि नागरी विमान मंत्रालयाची ‘एनओसी’ मिळविण्याची प्रक्रिया आठवड्यात पूर्ण करून दि. १५ आॅगस्टपासून विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. - खासदार धनंजय महाडिक
‘टेक आॅफ’ अंतिम टप्प्यात
By admin | Updated: August 12, 2014 00:42 IST