शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘जयवंत शुगर्स’चा अंतिम दर दोन हजार ३९३ रुपये

By admin | Updated: October 11, 2015 00:07 IST

टनाला २५० रुपयांप्रममाणे रक्कम खात्यावर जमा

कऱ्हाड : धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याने २०१४-१५ सालातील गळित हंगामात गाळप झालेल्या उसाला २,३९३ रुपये इतका उच्चांकी अंतिम दर जाहीर केला आहे. अंतिम दरातील २५० रुपये प्रतिमेट्रिक टन इतकी रक्कम सोमवार, दि. १२ रोजी सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. उच्चांकी दरामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांंमधून समाधान व्यक्त केले जात आहे. जयवंत शुगर्सच्या सन २०१४-२०१५ च्या गळित हंगामास १९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला होता. त्यानंतर झालेल्या १७३ दिवसांच्या कालावधीत एकूण ४ लाख ४० हजार १९० मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून, ५ लाख १७ हजार २२० क्विंंटल साखर पोत्यांचे उत्पादन करण्यात आले आहे. कोणत्याही उपपदार्थांचे उत्पादन न घेता जयवंत शुगर्सने नेहमीच उच्चांकी दर देण्याची परंपरा याहीवर्षी कायम राखली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणे हा दर देण्यात आला असून, कारखान्यामार्फत यापूर्वी गाळप झालेल्या ऊस बिलापोटी २१०० रुपये या अगोदरच अदा करण्यात आले आहेत. अंतिम दरातील २५० रुपये प्रतिमेट्रिक टन इतकी रक्कम येत्या सोमवारी (दि. १२) खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर उर्वरित ४३ रुपयेही लवकरात लवकर अदा करण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. (प्रतिनिधी)