शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

By admin | Updated: April 13, 2016 23:33 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

सातारा : ‘सातारा शहरालगत असलेल्या उपनगरांचा झपाट्याने विस्तार होत आहे. प्रलंबित असणारा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाच्या सचिवांशी चर्चा केल्यानंतर शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. आता हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे,’ अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पाहिजे त्या प्रमाणात उपनगरांचा विकास होत नसल्याने लाखो नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सातारा पालिकेच्या माध्यमातून शहरात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यांसह सर्व प्रकारच्या दर्जेदार सोयी-सुविधा पुरवल्या गेल्या असून, शहराचा कायापालट होत आहे. शहराच्या मानाने उपनगरांच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. उपनगरांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपनगरांचा समावेश पालिका हद्दीत होणे आवश्यक आहे. यासाठी सातारा पालिकेमार्फत राज्याच्या नगरविकास विभागाकडे हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाच्या सचिवांशी चर्चा केल्यानंतर शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. यामुळे हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्पयात आला असून, लवकरच प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. अनेक वर्षांपासून हद्दवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. उपनगरांचा झपाट्याने विस्तार झाला आहे. मात्र उपनगरांमध्ये समस्या सातत्याने भेडसावत आहेत. उपनगरांच्या विकासासाठी भरीव निधी मिळत नाही. उपनगरांसह शहरालगत असलेल्या करंजे, खेड, दरे खुर्द, कोडोली, गोडोली, विलासपूर, संभाजीनगर आदी गावांना बाजारहाट, आरोग्य, दळणवळ आदी बाबींसाठी सातारा शहरावरच अवलंबून राहावे लागते. (प्रतिनिधी) काही दिवसांत प्रस्ताव मंजूर..हद्दवाढ प्रस्तावानुसार सातारा शहरालगतच्या प्रस्तावित हद्दवाढ क्षेत्रामध्ये नियोजनबद्धरीत्या नियंत्रित विकास होण्याच्या दृष्टीने या हद्दवाढ प्रस्तावास त्वरित मान्यता मिळणे आवश्यक आहे. लवकरात लवकर हद्दवाढ झाली तरच सातारा शहराप्रमाणे उपनगरांचाही कायापालट होणार आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून हद्दवाढीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यासाठी आपण प्राधान्य द्यावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. येत्या काही दिवसांत हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.