शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पाणावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप...

By admin | Updated: March 23, 2015 00:45 IST

सरताळे : सूरज मोहिते अमर रहे; हजारो ग्रामस्थांकडून अंत्यदर्शन

कुडाळ/ वाई : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान सूरज मोहिते यांचे पार्थिव मूळ गावी गणेशवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे आल्यानंतर हजारो ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतले. तसेच यावेळी ‘सूरज मोहिते अमर रहे !, जब तक सूरज-चाँद रहेगा, सूरज मोहिते तुम्हारा नाम रहेगा !,’ अशा घोषणा देत पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान मोहिते यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यानंतर शहीद मोहिते यांचे पार्थिव सिद्धनाईवाडी (वाई)कडे नेण्यात आले. जावळी तालुक्यातील मूळचे गणेशवाडीचे असणारे सूरज सर्जेराव मोहिते हे ‘सीआरपीएफ’मध्ये कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना वीर मरण आले होते. दोन दिवसांपासून त्यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा जावळी तसेच वाई तालुक्यातील ग्रामस्थांना होती. रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास शहीद सूरज मोहिते यांचे पार्थिव गणेशवाडी येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक जवान मोहिते यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करीत होते. यावेळी ‘सूरज मोहिते अमर रहे !, जब तक सूरज-चाँद रहेगा, सूरज मोहिते तुम्हारा नाम रहेगा !,’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी प्रशासन आणि मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून अंत्यदर्शन घेतले. माजी आमदार मदन भोसले, पंचायत समिती सभापती सुहास गिरी, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार रणजित देसाई, आबानंदगिरी महाराज, सौरभ शिंदे, प्रशांत तरडे, सरताळेचे सरपंच विश्वनाथ गायकवाड, रवी परामणे आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी शहीद मोहिते यांच्याविषयी मित्रांनी पाणावलेल्या डोळ्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. सैन्य भरतीच्या वेळी सूरज मोहिते हे मित्रांबरोबर गेले होते; पण त्यावेळी ते एकटेच भरती झाले होते. जिद्द आणि चिकाटीमुळेच ते सैन्यात गेले होते. गरीब परिस्थितीतून खडतर मार्ग पार करीत त्यांनी हे यश मिळविले होते. फेब्रुवारी महिन्यातच ते सुटीवर असताना सरताळे येथे येऊन गेले. पण, नियतीच्या मनात वेगळेच होते. आमचा मित्र आम्हाला सोडून गेला याचे दु:ख आहे. पण, देशसेवेसाठी सूरजला वीर मरण आले याचा अभिमानही वाटतो, अशा भावना शहीद सूरज मोहिते यांच्या मित्रांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)मित्रांनी फोडला टाहो, ‘आमचा सुपरमॅन गेला...’गणेशवाडी येथे पार्थिव आल्यानंतर मित्रांच्या भावना अनावर झाल्या. आमचा सुपरमॅन गेला, असे म्हणत त्यांनी अश्रूला मोकळी वाट करून दिली. गेल्यावर्षी गुढीपाडव्याला गणेशवाडी अन् कापसेवाडी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत सूरज मोहिते यांचा सत्कार करण्यात आला होता; परंतु यावर्षी गुढीपाडव्याला ते शहीद झाल्याची बातमी समजली. सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.