शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार उपलब्ध जमीन

By admin | Updated: February 10, 2015 00:32 IST

केसुर्डी औद्योगिक वसाहत : मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

सातारा : केसुर्डी, ता. खंडाळा येथील औद्योगिक वसाहतीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांना शासनाने पर्यायी जमिनी दिलेल्या नाहीत. या प्रश्नाबाबत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली केसुर्डीतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. ९) जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन चर्चा केली. सुमारे दोन तास झालेल्या चर्चेतून जी जमीन उपलब्ध आहे, ती संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ वाटप करण्याचा निर्णय झाला.केसुर्डी येथे औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांची मोठी जमीन संपादित करण्यात आलेली आहे. या जमिनीपैकी १५ टक्के जमीन परतावा करणे बंधनकारक असतानाही शासनाने याबाबत निर्णय प्रलंबित ठेवल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. सुमारे २६७ शेतकऱ्यांचा हा प्रश्न असून, जमीन उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या या प्रश्नामध्ये तत्कालीन पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर व जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी लक्ष घालून महामार्गालगतची जमीन या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जमीन उपलब्ध होऊ न शकल्याने जमिनीचे वाटप झाले नाही. सेझ प्रकल्पातील मोठी जमीन शिल्लक आहे. ती जमीन औद्योगिक वसाहतीकडे वर्ग केल्यास शेतकऱ्यांचा प्रश्न मिटू शकतो, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपलब्ध जमिनीचे शेतकऱ्यांना वाटप करून हा प्रश्न मिटवावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नात अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, दि. ३ मार्च रोजी या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)