शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी अधिग्रहण; मोबदल्याचे काय?

By admin | Updated: April 15, 2016 23:35 IST

शिरवळ-बारामती चौपदरीकरण : काम ठप्प; प्रशासनाकडून ठोस निर्णय नाही, दळणवळणाचा प्रश्न कायम

खंडाळा : शिरवळ-लोणंद-बारामती चौपदरीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून ठप्प आहे. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या आहेत. त्यांच्या मोबदल्यासंदर्भात प्रशासनाकडून अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने प्रकल्पासाठी जमिनी देण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मोबदला दिला तरच चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचे मात्र बेहाल झाले आहेत. खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या शिरवळ-लोणंद-फलटण-बारामती या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय पाच वर्षांपूवीच घेण्यात आला होता. मात्र या मार्गासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला जाहीर न केल्यामुळे या मार्गावरील अंदोरी, दापकेघर, वाठार येथील शेतकऱ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. शासनाच्या विरोधात शेतकरी कृती समितीने न्यायालयात प्रयत्न केले. न्यायालयाने शेतकऱ्यांना जाहीर दराच्या चारपट रक्कम देण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत.या निर्णयानुसार जमिनीचा आकार लक्षात घेऊन त्यावर दर जाहीर केले आहेत. सुरुवातीला गुंठ्याला २५ हजार मोबदला देण्याचे जाहीर केलेले. मात्र या कायद्यानुसार आकारणी करून प्रतवारीनुसार ७० हजारांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत मोबदला देण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी वाई प्रांताधिकारी यांच्याकडून स्थानिक संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. जे शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून उच्च न्यायालयात गेले होते. त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत भूसंपादन अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.इतर शेतकऱ्यांप्रमाणे त्यांना नोटिसाही देण्यात आल्या नाहीत. उलट शेतकऱ्यांच्या जमिनीतील पोटखराबी हिस्सा अलग दाखवून शासनाने संभ्रम निर्माण केल्याने शेतकऱ्यांना कोणता निर्णय घ्यावा, असा प्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी) शेतकरी कृती समितीतून आम्ही न्यायालयात गेलो. शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्याप्रमाणे मोबदला जाहीर असताना प्रशासनाने ज्या नोटिसा दिल्या त्यात प्रत्यक्ष आकार, पोटखराबी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने प्रत्येक शेतकऱ्याला काय दर देणार हे मीटिंग घेऊन कळविले पाहिजे. अन्यथा न्यायालयाच्या मार्गानेच आम्ही मोबदला घेऊ.- कोंडिबा उम्रटकर, शेतकरी प्रशासनाची भूमिका जाहीर नाही...मुळातच प्रत्यक्ष भागवार किंवा गटवार प्रतिगुंठा किती रक्कम देणार आहेत. तसेच बांधकाम, घरे, झाडे, फळबागा, व्यावसायिक गाळे याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करणे गरजेचे आहे. पण प्रशासनाने कृती समितीसमोर ना शेतकऱ्यांसमोर आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला निश्चित रक्कम किती मिळणार आहे हेच समजत नाही. काम रखडल्याने दळणवळणाची समस्या...रस्त्याचे काम रखडल्यामुळे दळणवळणाची मोठी समस्या उद्भवली आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघातही होत असतात. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे.