शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोहीतील सत्काराने ललिता भारावली

By admin | Updated: August 26, 2016 23:29 IST

जंगी स्वागत : ग्रामस्थांची मोठी गर्दी

पळशी : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी ‘सातारा एक्स्प्रेस’ ललिता बाबरचे माण तालुक्यात आगमन झाले. दहिवडी, गोंदवले, लोधवडे पाठोपाठ मोही या तिच्या मूळगावी ग्रामस्थांनी ललिताचे फटाक्याच्या आतषबाजीत जंगी स्वागत करत मिरवणूक काढली. यावेळी झालेल्या सत्काराने ललिता भारावून गेली. शुक्रवारी सकाळपासूनच मोही ग्रामपंचायतीच्या पटांगणावर विद्यार्थी, क्रीडाप्रेमींनी तसेच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. चौकाचौकांत फटाक्यांचे आवाज घुमत होते. स्पर्धेनंतर पहिल्यांदाच ती आपल्या मूळगावी मोही येथे आल्याने घरोघरी रांगोळी काढून ललिताचे स्वागत करण्यात येत होते. ढोल-ताशांच्या गजरात ललिताची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला, मुले, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, आबालवृद्धांसह ग्रामस्थ तसेच क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अनुराधा देशमुख, डॉ. माधव पोळ, आई निर्मला बाबर, वडील शिवाजी बाबर, ललिताचे काका गणेश बाबर, रमेश शिंदे, विरभद्र कावडे, ज्ञानेश काळे, भारत चव्हाण आदी उपस्थित होते.मिरवणूक महालक्ष्मी मंदिराजवळ आल्यानंतर ललिताने देवीची पूजा केली. यावेळी मंदिरात आयोजित कार्यक्रमात ललिताला मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडाप्रेमींनी, ग्रामस्थांनी, विविध मंडळे, शाळा, पतसंस्थांनी ललिताचा सत्कार केला. (वार्ताहर)ललिताला मदत...सत्कारादरम्यान ललिताला वेळे येथील आराम हॉटेल यांच्याकडून पन्नास हजार, पिंजरा कला केंद्राकडून पन्नास हजार, श्रीराम गणेश मंडळाकडून (मोही) पंचवीस हजार, मोहीतील महालक्ष्मी पतसंस्थेकडून पंचवीस हजार तर महालक्ष्मी देवस्थानकडूनही अकरा हजार रुपयांची मदत देण्यात आली.