शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

लाखो भाविकांनी गजबजली पुसेगावनगरी

By admin | Updated: January 9, 2016 00:42 IST

सेवागिरी रथोत्सव : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, गुजरातमधील भाविकांचा उसळला महासागर

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात, बेल फूल, गुलालाची उधळण करत मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात शुक्रवारी श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव पार पडला. यावेळी महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांमधील सुमारे आठ लाख भाविकांनी पुसेगाव सुवर्णनगरीत हजेरी लावली. शुक्रवारी पहाटे श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक, मंत्रपुष्पांजली अर्पण करून आरती करण्यात आली. प्रारंभी फुलांनी सजवलेल्या मानाच्या रथामध्ये श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच विधिवत पूजनकरण्यात आले.सकाळी ११ वाजता सातारा पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या शुभहस्ते व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व मठाधिपती सुुंदरगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रथपूजन करण्यात आले. यावेळी माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. प्रभाकर घार्गे आ. आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, अतिरिक्त पोलीस अधिकारी एम. राकेश कलासागर, अ‍ॅड. विजयराव जाधव, सरपंच दीपाली मुळे, उपसरपंच रणधीर जाधव, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, रणजितसिंह देशमुख, ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुनीलशेठ जाधव, सभापती प्रभावती चव्हाण, मार्केट कमिटीचे सभापती सुनील घोरपडे, किरण बर्गे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विवेक साळुंखे व गटविकास अधिकारी डॉ. तानाजीराव लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी श्री सेवागिरी महाराजांच्या रथ व संजीवन समाधीचे दर्शन घेतले. श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस ११ वाजता प्रत्यक्षात प्रारंभ झाला. यावेळी टाळमृदगांच्या गजरात ढोलताशे व बॅण्ड पथकाच्या निनादामुळे सर्व वातावरण सेवागिरीमय झालेले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी असणारा गजराज आणि या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झालेले अश्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने नारळ, बेल फुल, पुष्पहार, पेढे व नोटांच्या माळा रथावर अपर्ण केल्याने मानाचा रथ नोटांनी शृंगारला होता. रथाच्या उजव्या बाजूने भाविकांची जाण्याची व डाव्या बाजूने येण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. सुवर्णनगरीमध्ये आलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने श्री सेवागिरी मंदिरात संजीवन समाधीच्या दर्शनासाठी शुक्रवारी पहाटेपासून भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. दरम्यान, मंदिराच्या गाभाऱ्यात श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने भक्तांना बुंदी प्रसादाचे मोफत वाटप करण्यात येते होते. याकामी स्वयंसेवकांसह शालेय विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. रथोत्सावाच्या पार्श्वभूमीवर श्री सेवागिरी मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथयात्रेस मंदिर ते यात्रास्थळ (मुख्यरस्ता), पोस्ट कार्यालयमार्गे मंदिर अशी बारा ते चौदा तास रथ मिरवणूक झाली. रथयात्रा संपल्यानंतर रथावरील देणगी रक्कम पोलीस बंदोबस्तात एकत्र करून श्री नारायणगिरी महराज भक्त निवासात नेण्यात आली. येथील विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनी रक्कम मोजण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत रक्कम मोजण्याचे काम सुरू होते.श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व पुसेगाव ग्रामपंचायत व सर्व प्रशासकीय विभागांकडून यात्रेकरूंना अधिकाधिक सोयीसुविधा पुरवल्या जात होत्या. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली उभारलेल्या नियंत्रण कक्षातून प्रशासन व यात्रा नियोजनांचा समन्वय साधला जात होता. उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर गायकवाड व सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)खरेदीसाठी यात्रेकरूंची गर्दीबैलबाजार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बालगोपाळ, युवक, युवतींची पाळण्यात बसण्यासाठी रेलचेल सुरू होती. यात्रेकरूंचे खास आर्कषण आकाश पाळण्यात बसण्याचा आनंद यात्रेकरूंनी घेतला. गरमागरम जिलेबी, फरसाणा व इतर मिठाईचा आस्वाद घेण्यासाठी अनेकांनी हॉटेलमध्ये गर्दी केली होती. सौंदर्यप्रसाधने खरेदीसाठी युवतीची झुंबड उडलेली होती. मिठाई स्टॉल, मनोरंजन साहित्य, स्वेटर, हॉटेल व विविध दुकानांमध्ये खरेदीसाठी याथेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आरोेग्य विभागाने मंदिर व यात्रा परिसरात चार वैद्यकीय पथके ठेवली होती. रथाभोवती तसेच दर्शन रांगेवर व गर्दीच्या नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे व स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली.फलकमुक्त यात्रा पुसेगाव येथे शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केलेल्या आवाहनाला पुसेगाव ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन यावर्षी प्रथमच फलकमुक्त पुसेगाव यात्रा पार पडली. यात्रास्थळावर कोठेच देवस्थान ट्रस्ट व्यतिरिक्त फलक नसल्याने या उपक्रमाचे यात्रेकरूंनी कौतुक केले.बैलगाडी शर्यतीकडे शौकिनांचे लक्ष श्री सेवागिरी रथोत्सवाच्या मुख्य दिवशी बैलगाड्यांच्या शर्यती सुरू होणार असल्याचे वृत्त समजल्याने बैलगाडी शौकिनांसह बैल बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार होणाऱ्या खोंडांनाही मागणी वाढल्याने त्यांनाही त्यांच्या पशुपालन व्यवसायातून योग्य मोबदला मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, ११ जानेवारी रोजी बैलगाडी शर्यती होण्याची शक्यता वर्तविली जात असून सेवागिरी देवस्थानकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.